shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक वर्षापासून वीज चोरी करणाऱ्या ठेकेदारावर महावितरणची कारवाई..!मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या आंदोलनाला यश..!


श्रीरामपूर । प्रतिनिधी : 
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी-वळदगाव- उंबरगाव रस्त्यावरील चालू असलेल्या रेल्वेच्या अंडरग्राउंड पुलाचे काम सुरू आहे. सदर कामाचे शेजारून पाट वाहत आहे. त्या पाण्याचा पाझर व सध्या होत असलेल्या पावसामुळे सुद्धा पुलाचे कामाचे ठिकाणी खड्डयात पाणी असते, हे पाणी उपसण्यासाठी संबंधित ठेकेदाराने गेल्या एक वर्षापासून जोशी वस्ती येथील डी पी वरून चोरुन विज वापरत असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांना लक्षात आले. 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व घटनेची व्हिडिओ शूटिंग श्रीरामपूर येथील महावितरणचे अधिकाऱ्यांना सर्व व्हिडीओ चित्रीकरण दाखवले. त्यांना निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्यात यावी असे सांगितले परंतु अधिकारी घटनास्थळी लगेच जात  नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरडाओरडा करून घोषणाबाजी चालू केली व कार्यकारी अभियंता श्री थोरात उपकार्यकारी अभियंता क्षिरसागर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी लगेचच कार्यालयात येऊन मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवतर, शहराध्यक्ष गणेश दिवसे, मनसे सहकार सेनेचे तालुकाध्यक्ष उदय उदावंत, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विकी राऊत, शहराध्यक्ष विद्यार्थी सेना विशाल शिरसाट, यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. 
यानंतर तातडीने श्रीरामपूर विभागाचे प्रमुख श्री आहेर यांना घटनास्थळी पाठवून त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने श्री आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर विज कनेक्शन तोडून  वायर ताब्यात घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना सादर केला व नियमाप्रमाणे पुढील कठोर कारवाई होईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की गेल्या एक वर्षापासून विज चोरी होत असताना त्या भागातील नेमणूक केलेल्या महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही डीपी वरून कनेक्शन कोणाच्या सहकार्याने जोडले . या विजचोरी मध्ये कोण कोण अधिकारी व कर्मचारी ठेकेदाराला सामील आहेत. याची सखोल चौकशी करून ठेकेदारा बरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आरोपी करून कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे. याच्यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला.
close