प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: (दि.१४) : कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर करण्यात आले आहे. परिणामी करमाळा शहरात दुकाने पूर्णपणे बंद असले तरी विनाकारण फिरणाऱ्या लोकांची गर्दी दिसत आहे . बर्याच प्रमाणात काही व्यक्तीच्या तोंडाला मास्कही दिसून येत नाहीत .
करमाळा शहरात दुकाने पूर्णपणे बंद स्वरूपात दिसत असली तरी पण लोकांची गर्दी काही कमी दिसत नाही . जिल्हाधिकाऱ्यांनी जे संचारबंदी चे आदेश काढले आहेत त्याला करमाळाकरांनी केराची टोपली दाखवली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे व विना मास्क फिरणारे भरपूर दिसून येत आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लोकांवर कारवाई करावी जेणेकरून कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत.
या लॉकडाउन काळात लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .तरी प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने योग्य ती कारवाई करून लॉक डाऊन चे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे .

