अंकिता पाटील यांची कार्यतत्परता. अमोलराजे इंगळे यांनी कळवताच अधिकाऱ्यांना सांगून बाभूळगावातील रोहित्र केले चालू.
वैभव काळे , राजेंद्र शेख व नवनाथ गुरगुडे या कर्मचाऱ्यांचे होत आहे कौतुक..नवीन रोहित्र उपलब्ध नसल्याने विशेष प्रयत्नातून केले दुरुस्त.
इंदापूर प्रतिनिधी: (१४ ऑगस्ट २०२१)सुमारे अकरा दिवस बाभुळगावातील गुरव वस्ती येथील रोहित्र काही कारणाने बंद होते. तेथील ग्रामस्थांच्या झालेल्या गैरसोयी वर माजी सरपंच दादासाहेब यादव यांनी अमोलराजे इंगळे यांना सदर घटनेची माहिती दिली असता, इंगळे यांनी तात्काळ जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांना कळवले. सदर गैरसोय बद्दल ताबडतोब त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन गुरुव वस्ती येथील रोहित्र चालू करण्यास सांगितले. यानंतर तेथील लाईनमन वैभव काळे, राजेंद्र शेख व नवनाथ गुरगुडे यांनी एकेरी विद्युत वाहिनी रोहित्र उपलब्ध नसल्याने आलेल्या अडचणी पुढे यांनी सदर नादुरुस्त झालेली रोहित्र विशेष प्रयत्न करून दुरुस्त केले. यामुळे बंद असलेले रोहित्र तात्काळ(दि.१३ ऑगस्ट) रोजी सुरू करून तेथील ग्रामस्थांची गरसोय दूर झाली.
सदर रोहित्र अंकिता पाटील यांना कळविल्यानंतर तात्काळ चालू केल्याने बाभुळगावातील गुरव वस्ती येथील ग्रामस्थ तसेच माझी सरपंच दादासाहेब यादव यांनी त्यांच्या या कामाबद्दल विशेष कौतुक करीत आभार मानले. तसेच रोहित्र उपलब्ध नसतानाही सदर रोहित्र विशेष प्रयत्नाने चालू केल्याबद्दल काळे व गुरगुडे यांचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे
या रोहित्र दुरुस्ती संदर्भात अमोलराजे इंगळे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, बाभूळगाव गावातील गुरव वस्ती येथील रोहित्र नादुरूस्त होते. ही माहिती माजी सरपंच दादासाहेब यादव यांनी मला दिली. त्यावेळी तत्काळ पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील यांना कळवल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन हे रोहीत्र चालू करण्यास सांगितले आणि तात्काळ गुरव वस्ती येथील रोहित्र चालू करण्यात आले .तसेच बाभुळगाव येथील कामे असल्यास तात्काळ कळवावे असे अंकिता पाटील यांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

