shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक सभागृह प्रकरणी राजकीय वैमानष्यातुन नाहक बदनामी - जि.प.सदस्य विजयकांत मुंडे..!!

रेणूकामाता प्रतिष्ठानने योग्य जागीच सभागृह बांधले..!!


प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

मौजे सारूळ (अंबळाचे बरड) धावज्याचीवाडी येथे सामाजिक सभागृह (जनउपयोगी भवन) उभारून केज व बीड तालुक्यातील जनतेला मदतीचा हात देत रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानने आपला उद्देश पूर्ण केला आहे.परंतू संस्थेच्या मालकीच्या जागेतील सर्वे.नं.२१ ई मध्ये सभागृह बांधकामास जागा अपुरी आसल्याने प्रशासकीय मान्यतेत उल्लेख आसलेल्या जागे लगतच सर्वे.नं १५५ मध्ये सभागृहाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे.तरी खास बाब म्हणून सदरील सभागृह बांधकामाच्या जागेत किरकोळ बदल करूण सुधारीत मान्यता देण्यासबंधी मा.खा.रामदासजी आठवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केले आहे.परंतू काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरून रेणुकामाता विकास प्रतिष्ठान व मुंडे पिता-पुत्रांनी सभागृह न बांधताच निधीचा अपहार केल्याचा आव आणत काही राजकीय व्यक्तींकडून राजकीय द्वेषापोटी नाहक बदनामी केली जात आहे.दरम्यान सध्या प्रत्यक्षात सामाजिक सभागृह (जनउपयोगी भवन) जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.



मा.खा.श्री रामदासजी आठवले यांच्या खासदार फंडातून सन-२०१७-१८ या आर्थिक वर्षांत रेणूकामाता कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेने बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत मौजे धावज्याचीवाडी स.न.१५५ मध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण केले आहे.सभागृह बांधकामाच्या कामात कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नसून सामाजिक सभागृह सध्या केज तालुक्यातील व बीड तालुक्यातील जनतेला मदतीचा हात देत आहे.तसेच खास बाब म्हणून २०१७-१८ या आर्थिक वर्षांत मा.खासदार रामदास आठवले यांच्या खासदार फंडातून मंजूर सभागृह बांधकामाच्या जागेत किरकोळ बदल कण्यासबंधी मा.खा.रामदासजी आठवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे.तर सुधारीत मान्यता देण्यासबंधी जिल्हाधिकारी बीड यांनी नियोजन अधिकारी बीड यांना पुढील कारवाई करण्याचे सुचविले होते.तसेच २१ जुन २०२१ रोजी बीड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सामाजिक सभागृह (जनउपयोगी भवन) मंजूर असलेल्या सर्व्हे.नं.२१ ई मध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे सामाजिक सभागृह मंजूर असलेल्या सर्वे.न.लगत सर्वे.नं.१५५ धावज्याचीवाडी येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.तसेच त्या जागेत किरकोळ बदल करण्यासबंधित बीड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव पारित करूण मान्येतेसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला आहे.


सदरील सामाजिक सभागृह (जनउपयोगी भवनाचे) बांधकाम पूर्णता बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली आई कन्स्ट्रक्शन बीड यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केले आहे.परंतू या भागातील काही राजकीय व्यक्तींना विकास काय असतो,तो कसा करावा लागतो,निधी कोठून आणावा लागतो हे कसलेच माहित नसून फक्त रोज उठून ग्रामपंचायतीने केलेल्या कामापासून प्रत्येक कामाच्या तक्रारी करून हात साफ करणेच माहित आसून राजकीय द्वेषातूपोटी मुंडे-पिता पुत्रांवर भ्रष्टाचाराचे आरोप करूण बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

close