shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळा धरणातून लवकर पाणी सोडा..!!

प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई 

मुळा धरणाच्या पाण्याखाली असलेल्या क्षेत्रात खरीप पिकांनी अक्षरशः माना खाली टाकल्याने पिके हातून जाण्याची भीती वाटते, तरी

शासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेऊन मुळा धरणातून खरीप पिकासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त श्री.विश्वासराव गडाख यांनी केली आहे.



मंत्री.शंकरराव गडाख  यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर महाराज मंदि राचे विश्वस्त  विश्वास राव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी शिष्टमंडळमुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सोडावे या मागणीचे निवेदन देणार आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तालुक्यांमधे पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. पुर्ण खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन, कपाशी, तूर, बाजरी, भुईमूग तसेच फळबागांना पाण्याची खूप आवश्यकता असून मुळा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने खरीप पिकांसाठी मुळा धरणातून त्वरित आवर्तन सोडावे अशी मागणी केली.

        

या बाबद संबंधित मंत्री महोदय यांनी सध्या ची पाण्याची बिकट परिस्थिती लक्षात घेता आवर्तन सोडण्याची गडाख यांनी मागणी केली आहे.

close