shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काँग्रेस पक्षाच्यावतीने अनेक पद नियुक्त्या,दरेवाडीतील सौ. वर्षा राजू भिंगारदिवे यांची अनुसूचित जाती नगर तालुका अध्यक्ष पदी निवड..!!

नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने पक्ष बांधणीसाठी अनेक महिला व युवकांना प्रमुख पदे वाटप केले आहेत. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नाथा आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली शहरातील व तालुक्यातील अनेक महिला व युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या देशात काही वर्षांत वाढलेली बेरोजगारी हटविण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी महिला व युवकांना पुढाकार देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण पक्षाचे काम व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन कार्यकारिणी स्थापन केली आहे असे यावेळी सांगण्यात आले.



अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सौ. वर्षा राजू भिंगारदिवे यांची नगर तालुका अनुसूचित जाती महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर शहर अध्यक्ष पदी जयश्री सूर्यवंशी, शहर संघटक उज्वला गायकवाड, शहर उपाध्यक्षपदी रेखा आरोळे, शहर कार्याध्यक्ष सविता विधाते, युवकांमध्ये शहर उपाअध्यक्ष संतोष जगताप, संघटक प्रशांत भिंगारदिवे, भिंगार शहर विभाग जितेंद्र जाधव, नवनागापुर  विभाग अध्यक्षपदी अविनाश कांबळे,  महासचिवपदी गौतम सूर्यवंशी, प्रताप थोरात कार्यअध्यक्ष, दत्ताभालेराव सचिव




अशी एकूण ५० पदाधिकारी कार्यकर्त्यांची कार्यकारिणी करण्यात आली. यासर्व महिला व युवकांना आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते पद नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष किरण काळे, अनुसूचित जाती शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, ज्ञानदेव वाफारे, खलिल शेख, मनोज गुंदेचा, लखन सरोदे, गणेश बडेकर आदी उपस्थित होते.

close