shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे भाई गणपतराव देशमुख यांना शोकसभेतुन श्रद्धांजली अर्पण..!!

शेकापचा वर्धापन व नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विन्रम अभिवादन.

================================

प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-

शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय. भाई गणपतराव देशमुख यांना केज येथे शेकाप कार्यालसमोर शोकसभेतुन  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तर क्रांती सिंह नाना पाटील व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन कऱण्यात आले.




या बाबत अधिक माहिती अशी की शेतकरी कामगार पक्ष केज येथील कार्यालयासमोर शोकसभा घेण्यात आली.

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले असुन त्यांना महाराष्ट्रत सर्वस्तरातुन श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. केज येथेही शेकापच्या कार्यालयासमोर दि.३ ऑगस्ट रोजी मंगळवार या दिवशी दुपारी १२:०० वा.स्व.गणपतराव देशमुख यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जेष्ठ नेते रंजितसिंह पाटिल यांनी स्व.गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली. स्व.भाई गणपतराव देशमुख एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व असताना देखील सामान्य जीवन जगले सलग ११ वेळा निवडुन येणे  सोपं नाही. पण त्यांनी ते करुन दाखवले व  देशासमोर एक  वेगळा आदर्श ठेऊन गेले असे मत माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केलं,आजच्या आमदारांनी गणपतरावांचे गुण अंगीकारण्याची गरज आहे. तर लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचे कार्य कर्तृत्व सामान्यासाठी होत. असे मत भोसले सर यांनी  लोकशाहिर आण्णाभाऊ साठे आणि क्रांतीसिंह नाना पाटिल यांच्या जयंतीनिमित्ताने   व्यक्त केले. शिवसेनेचे रत्नाकर शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

तर उपस्थितांनीही क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालुन विन्रम अभिवादन करण्यात आले.

या शोकसभेला विविध क्षेत्रात काम करणारे मंडळी उपस्थीत होती. 

आबांनी शेतकरी कामगारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं याचा आदर्श घेऊन आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून शेकापचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करत राहु आशा भावना भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केल्या. या वेळी

क्रांतिसिंह नाना पाटील व कॉम्रेड लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आणि स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर हनुमंत घाडगे यांनी भावना व्यक्त केल्या. बहुजन रयत परीषदेचे रमेश पाडुळे , महिला समुपदेशक जनाबाई खाडे , हनुमंत साने , जी. डी. देशमुख पत्रकार दशरथ चवरे , आनिल गलांडे , महादेव काळे , रंजित घाडगे , बापु वैरागे अमोल सावंत यांचेसह अॅड कोठावळे , अॅड सुदर्शन मुंढे , अॅड निखिल बचुटे , व भागवत पवार , डिगांबर मगर ,  राणीताई बावणे , आशाताई चाटे ,यांनीही  श्रद्धांजली वाहिली.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाई अशोक रोडे , मंगेश देशमुख , हनुमंत मोरे , विशाल मुळे यांनी परिश्रम घेतले.


आणि भाई मोहन गुंड गहिवरले !

आबांनी शेतकरी, कामगारासाठी शेवटच्या श्र्वासापर्यंत काम केलं याचा आदर्श घेवुन आम्ही कार्यकर्ते म्हणून शेकापचा झेंडा खांद्यावर घेवुन काम करत राहु. मी त्यांना खुप जवळुन पाहिले आहे. असे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला अंतकरण गहिवरून आले. डोळ्यात अश्रु दाटले ते अश्रु त्यांना आवरता आले नाहीत. आणि अखेर त्यांनी अश्रुला वाट मोकळी करून दिली.

close