प्रतिनिधी । विनया मेढेकर
पनवेल :-पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर चिपली ब्रिज जवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या मारुती सुझुकी कार ने ठोकर दिल्याने अपघात झाला आहे.
या अपघातात चालक व त्याच्या सोबत असलेले दोघे जण जखमी झाले आहेत. मारुती सुझुकी कंपनीची कार नंबर MH43 AF 8852 चालकाविरुद्ध पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर राम अवजी वय 30 रा. सुकापूर ,प्रकाश बन्सी परिहार वय 29 रा. सीवूड आणि भरत करण परिहार वय 32 रा. ठाणे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
ट्रक क्रमांक MH13 G 0773 हा ट्रक पुणे ते मुंबई असा पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करीत होता. पुणे एक्सप्रेस वे वर चिपले येथे 7.900 किलोमीटर वर आले असता ट्रक चा जॉईंट तुटला त्यावेळेस ट्रक चालकाने एका बाजूला ट्रक थांबवत इंडिकेटर लावून ट्रक दुरुस्त करीत होते.
त्याच वेळेस मागून भरधाव वेगाने येणार्या मारुती सुझुकी कारने ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. त्यामध्ये कारचे चालकासह इतर दोन सहप्रवासी जखमी झाले. या अपघातात कारच्या बोनेट सह कारचे पुढील दरवाजे, गाडीचे वरील टफ, काच, हेडलाईट फुटून गाडीचे नुकसान झाले आहे, सोबतच ट्रकचे मागील सेफ्टी गार्ड तुटून नुकसान झाले आहे .

