इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी संजय देवकर यांची निवड..!
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव चे संजय वामन देवकर यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक विभागीय कार्यालय या ठिकाणी कोरोना योद्धा पुरस्कार प्रसंगी दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर ,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संजय वामन देवकर हे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणूक लढवली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. संजय देवकर हे राष्ट्रवादी पक्षाचे बाभूळगाव परिसरातील एक सक्षम राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांच्या पत्नीही बाभुळगाव च्या सरपंच होत्या. या काळात बाभूळगावरील विकास कामे त्यांनी केली. सदर या कामाचा विचार करून पक्षाच्या वतीने त्यांना इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करून इंदापूर तालुक्यातील पक्षाच्या कार्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली.
संजय देवकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे पुव॔ भागातील वजनदार नेते आसुन त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची धुरा ते समथ॔पने संभाळत आहेत याच कार्याची दखल घेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्यावर हि मोठी जबाबदारी टाकली आहे.
संजय देवकर यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

