shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्ता इंदापूर पोलीस स्टेशनकडे स्पीड बोटीचा समावेश..उजनी जलाशयात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाईसाठी सहज शक्य होणार - पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे.

आत्ता इंदापूर पोलीस स्टेशनकडे स्पीड बोटीचा समावेश..
उजनी जलाशयात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाईसाठी सहज शक्य होणार - पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे.

इंदापूर प्रतिनिधी: (दि.६ ऑगस्ट २०२१)इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयातील अवैद्य वाळू उपसा करणार्‍या यांत्रिक बोटी पकडण्यासाठी इंदापूर पोलिस स्टेशनकडे शुक्रवार (दि०६)  रोजी  धन्यकुमार गोडसे  पोलीस निरीक्षक इंदापूर पोलिस स्टेशन व  अनिल ठोंबरे  तहसीलदार इंदापूर यांचे उपस्थिती मध्ये इंदापूर पोलीस ठाणे कडील नवीन स्पीड बोटचे उद्घाटन करण्यात आले. 
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, पोलीस नाईक झरेकर, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद, अमोल गारुडी, महिला पोलिस कॉन्स्टेबल जगताप,इंगवले तसेच पोलीस पाटील सुनील राऊत,पोलीस मित्र बापू झगडे,राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

इंदापूर पोलीस स्टेशनला स्पीड बोट दिलेली आहे. त्या स्पीड बोटीचा पाण्यात पेट्रोलिंग मुळे प्रचंड फायदा होणार आहे .वाळू तस्कर बोटीच्या साहाय्याने जे चोऱ्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चाप बसणार आहे.बोटीचा उपयोग पोलीस प्रशासन व महसूल विभागास पेट्रोलिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे . उजनी जलाशयातील वाळू तस्करांवर कारवाई करणे सहज शक्‍य होणार आहे अशी माहिती इंदापूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.



close