श्रीरामपूर । प्रतिनिधी: - येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांना शासनातर्फे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरविण्यात आले,
ही त्यांच्या कर्तबगार कार्याची पावतीच होय, त्यांनी कर्तबगारीने करोना काळात तसेच तालुक्यातील आपत्तीच्यावेळी जनतेची कामे मार्गी लावली आहे.
म्हणून त्यांना शासनातर्फे उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर, रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे बन्सी फेरवानी,संस्कार भारती रांगोळी कलाकार सौ. कलावती देशमुख, सतपालसिंग गुंडू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

