जिजाऊ ज्ञान मंदिर भिकोबानगर या संस्थेचा अभिनव उपक्रम.
कोरोणा काळात पालकांचे छत्र हरपलेल्या पाच मुलांना मोफत शैक्षणिक प्रवेश व इयत्ता दहावी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च.
इंदापूर: जागतिक कोरोना महामारी च्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले अशाच पाच मुलांना आई-वडिलांचे छत्र हरवल्याने बारामती तालुक्यातील धुमाळवाडी भिकोबानगर येथील महाराणी सईबाई सेवाभावी संस्थेचे जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम च्या वतीने मोफत प्रवेश देऊन दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात आला आहे.
पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत प्रवेश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडत वाहत होता. या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या हस्ते मंगळवार (दि. ३ )रोजी करण्यात आला.
या वेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश कवितके, पणदरे सरपंच मीनाश्री जगताप, धुमाळवाडी सरपंच कविता सोनवणे, पवईमाळ सरपंच अतुल जगताप, संतोष मचाले स्वाती जगताप, संस्थेचे अध्यक्ष विनोद जगताप, सचिव नितीन जगताप उपस्थित होते.
याप्रसंगी कोकण, कोल्हापूर, सांगली सातारा या ठिकाणच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून संस्थेच्या वतीने पाच हजार रुपये व जीवनावश्यक वस्तू प्रशासनाकडे देऊन सामाजिक बांधिलकी दाखवली. अशाच पद्धतीने संस्थेच्यावतीने नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चात सवलत देऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी कार्य नेहमीच होत असून. त्यांच्या या कार्यातून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ झाला आहे. या शिक्षण संकुलातील शिक्षक वर्ग हा अतिशय उत्तम पद्धतीने मुलांना शिकवत असताना नेहमी दिसत असतो. सध्या कोरोणा काळात ऑनलाईन शिक्षण प्रणाली नुसार अप्रतिम असे शिकवण या शाळेद्वारे चालू आहे. त्यास विद्यार्थ्यांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या शाळेच्या प्रत्येक उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष विनोद जगताप यांचे अतिशय बारकाईने लक्ष असते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याचेही दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन योगिता कांबळे व मनीषा जगताप यांनी केले.
तर संस्थेच्या प्राचार्य स्वरांजली जगताप यांनी आभार मानले.

