प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
माहेरी गेलेल्या बायकोला सासरी पाठविण्या वरून एका जावयाने सासूला मारहाण करून चक्क मेव्हण्याला चावा घेवुन जखमी केले आहे.
शिरुरघाट ता. केज येथील रामचंद्र माणिक सांगळे याची पत्नी ही मुंडेवाडी येथे तिच्या माहेरी गेली होती. दरम्यान दि. ३० जुलै रोजी रात्री ११:०० तिला आताच सासरी पाठवा; असे म्हणून जावई रामचंद्र सांगळे याने मुंडेवाडी येथे सासरवाडीत त्यांच्या घरा समोर येवुन मोठ मोठ्याने ओरडुन शिवीगाळ केली. सासू-सासऱ्याच्या घराचे दरवाजावर लाथा मारून त्याच्या पत्नीस मुला-बाळासह आताच त्याच्या पत्नीला सोबत चल असे म्हणाला. त्यावर त्याची सासू ही मुलीस आत्ताच पाठवणार नाही असे म्हणताच राग येऊन रामचंद्र सांगळे याने त्याच्या सासूला चापट बुक्क्याने मारहाण केली. या वेळी त्याचा मेव्हणा अभिषेक बांगर हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता; रामचंद्र सांगळे हा अभिषेक बांगर याला लाथा-बुक्क्याने मारहाण करून त्याचे डावे हाताचे दंडास व उजव्या बाजुचे छातीवर चावुन दुखापत केली. तसेच पत्नी व मुलाना जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अभिषेक बांगर याच्या तक्रारी वरून रामचंद्र सांगळे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दि. ३१ जुलै रोजी गु. र. नं. ३७३/२०२१ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४ व ५०६ नुसार दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत.

