shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कु.श्रृती धपाटे हिने मिळवले राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश..!!




प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-

जि.प.माध्यमिक शाळा, भाटूंबा ता.केज या ग्रामीण शाळेतील विद्यार्थीही कु.श्रृती विजयकुमार धपाटे (इ.10वी) हिने अक्षर मानव या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी व युवक-युवती सहभागी झालेले होते. सदर संस्थेमार्फत लवकरच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तके पाठविण्यात येणार आहेत. 

भाटूंबा ता.केज येथील जि.प. शाळेमार्फत कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणावर शासकीय निर्देशानुसार भर देण्यात आल्याने, नियमित अभ्यासासह सहशालेय उपक्रम देखील राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले होते. कु.श्रृतीने या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपला ठसा उमटविला आणि अक्षर मानव संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. 

शाळेतील शिक्षक श्री. प्रमोद शिंदे सरांनी सांगितलेली विशेष बाब म्हणजे या सरकारी शाळेतील ऑनलाईन शिक्षणाचा लाभ केवळ भाटूंबा गावातीलच विद्यार्थ्यांनाच होत नसून औरंगाबाद, बीड, रत्नागिरी, केज तालुक्यातील काही गावातील विद्यार्थी देखील नियमित सहभागी होतात. अशाच विद्यार्थ्यांपैकी एक कु.आदिती संदीप कुंभार (इ.9वी) रा.भू ता.राजापूर जि.रत्नागिरी याच स्पर्धेत द्वितीय आलेली आहे.

फोनवरून झालेल्या संभाषणातून मुख्याध्यापक श्री.कंचनवार सर यांनी सांगितले की, 'प्रत्येक शाळा ही उपक्रमांचे मोहोळ असावी' या तत्वाला अनुसरूनच आमची शाळा मार्गक्रमण करत आहे, शाळेत वर्षभर उपक्रमांची रेलचेल असते. ग्रामीण भाग, गरिबी, रेंज नसणे, मोबाईल उपलब्ध नसणे या अडचणी आहेतच तरीदेखील झूम, युट्यूब, सेतूअभ्यास यांसारख्या ऑनलाईन बाबी आमचे शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावीपणे वापरत आहेत. 

कु.श्रृती धपाटे हिने तिच्या यशाचे श्रेय तिच्या शिक्षकांना दिले, शाळेत वर्षभर विविध विषयांवरील निबंध, भित्तीपत्रके, पत्रलेखन नेहमी सुरुच असल्याने स्पर्धेसाठी विशेष वेगळ्या सरावाची गरजच पडली नाही आणि, लवकर शाळा सुरु व्हावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. 

प्रशाला भाटूंबा शाळेतील शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्री.सुधाकर धपाटे आणि शाळेतील शिक्षकवृंद श्री.आंधळे सर, भारती सर, क्षीरसागर सर, चवरे सर, हंडिबाग सर, ठाकर मॅडम, आचार्य मॅडम, अंबाड मॅडम, चौरे मॅडम, शिंदे सर व मस्के मामा आणि समस्त गावकरी श्रृतीचे कौतुक करत आहेत.
close