shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लंके प्रतिष्ठान हे तरूणाईच्या माध्यमातून देशात रोल माॅडेल ठरेल - पद्मश्री पोपटराव पवार


निलेश लंके प्रतिष्ठान कार्यालयाचा शुभारंभ

 प्रतिनिधी : रफीक शेख

पारनेर : (दि १७) : तरूणाई ही देशाची राष्ट्राची संपत्ती आहे . राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात लंके प्रतिष्ठान अव्वल असून आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून लंके प्रतिष्ठान तरूणाईच्या माध्यमातून देशात रोल माॅडेल ठरेल असा आशावाद पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, तालुका भाग्यवान आहे .ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‌नंतर कोरोना मुक्तीसाठी  आमदार निलेश लंके यांचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे. सर्वसामान्य आमदार निलेश लंके यांनी जीवावर उदार होऊन हजारो लोकांना जीवदान दिले असल्याचेही पवार यांनी सांगितले .


निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा शुभारंभ आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष माजी सभापती सुदाम पवार, राजेंद्र चौधरी, उद्योजक सुरेश धुरपते , तालुकाध्यक्ष बापू साहेब शिर्के ,युवक‌ तालुकाध्यक्ष विजय औटी , अशोकराव घुले , जितेश सरडे, डॉ .बाळासाहेब कावरे, शैलेश औटी , अरूण पवार, महिला तालुकाध्यक्ष पुनमताई मुंगसे, कारभारी पोटघन , उद्योजक सचिन पवार ,सोमनाथ वरखडे, मेजर श्रीकांत चौरे , किशोर यादव ,अमोल यादव, सोलापूरचे जि.प.सदस्य संतोष वारे ,नगरसेवक मुदस्सर सय्यद, आनंदा औटी , सचिन गवारे, सरपंच प्रकाश गाजरे , उपसरपंच संदिप शिंदे, अमित जाधव, संदिप ठाणगे , अभिजीत ससाणे‌ , नवनाथ बागल , सरपंच सचिन पठारे, माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, बाजीराव कारखिले, अभयसिंह नांगरे , संतोष ढवळे, शिवाजी शिंदे, चंद्रकांत मोढवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी पोपटराव पवार म्हणाले की आर.आर.पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अनेक गावात काम केले आहे.त्यामुळे सकारात्मक विचार समाज हितासाठी राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.प्रत्येक पक्षाला सामाजिक चेहरा असणे गरजेचे असते‌ . त्यामुळे‌ मंत्री पद मागण्याची गरज नाही.काही राजकीय काम यांच्याकडून होत नाही त्यावेळी सामाजिक शक्ति कामाला येते.सामाजिक काम करायला लागले की विरोध व्हायला सुरुवात होते.त्यामुळे‌ कोरोना काळात लोकांच्या मनातील भिती काढण्याचे काम आमदार निलेश लंके यांच्याप्रमाणे आम्ही केलं आहे.सामाजिक कामाला दुर नेण्याची ताकद ही मिडियामध्ये आहे.महिला सक्षमीकरण, आरोग्य शिक्षण , दिव्यांग, इतर सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम लंके प्रतिष्ठानने केले आहे . सामाजिक व राजकीय व्यवस्था बरोबर चालली तर प्रशासनही चालते.

बिगर अभ्यासाचे काही होत नाही .त्यामुळे कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहुन‌ काम केले पाहिजे.आपला अनुभव हा लोकांना ‌ वाटत चाललो‌ आहे.त्यामुळे‌ विरोधकांना ऑडिटर म्हणून पहा .त्यांचा राग करू नका.कोरोनाने सर्वांना जमिनीवर आणले असुन निर्व्यसनी व निरोगी तरुण हेच आदर्श कुटुंब ठरणार आहे.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की ,२८ जुन २०११ पासून आरोग्य शिबीर असो वा रक्तदान शिबिर असो‌ विविध सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविले जात होते .गोरगरीब व गरजूंना मदत करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले‌ आहे.ही एक‌ सामाजिक संस्था असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ‌‌‌‌‌आणि पोपटराव पवार यांच्या मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यामुळे‌ यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी मागता येतो.त्यामुळे मतदार संघात काम करण्यासाठी यांचा फार मोठा फायदा झाला असल्याचे आ.लंके म्हणाले.६०० सायकल ,रक्तदान शिबिर , स्पर्धा परीक्षेसाठी मोफत क्लास अशा विविध प्रकारे प्रतिष्ठान काम करत आहेत.
यावेळी संतोष वारे म्हणाले की , आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून कामे‌ होत असतात . परंतु करमाळा तालुक्यात शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटर यांच्या मदतीतुन उभे‌ राहिले.या सेंटरच्या माध्यमातून ५०० च्या वर रुग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत .सोलापुर व पंढरपूर जिल्ह्यातील अनेक रुग्ण भाळवणी येथील आरोग्य मंदिरात बरे झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात आ . लंके यांना मंत्री पदाची संधी निश्चित मिळणार असल्याचे वारे म्हणाले .यावेळी माजी सभापती सुदाम पवार म्हणाले की , निलेश लंके यांनी सेनापती बापट, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नंतर कामाच्या माध्यमातून पारनेरची ओळख देशात राज्यात निर्माण केली आहे. निलेश लंके यांच्या वर अन्याय झाला त्यावेळी प्रतिष्ठानने जीवाचे रान करत विधानसभा निवडणुक जिंकली.

विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रात प्रतिष्ठान योगदान देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून  ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌गावगावात जाऊन काम पोहचविले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरपंच राहुल झावरे यांनी केले तर आभार बापूसाहेब शिर्के यांनी मानले.


close