तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत द्या : अंकिता पाटील
सातपुतेवस्ती येथे सात एकर ऊस जळून खाक
इंदापूर प्रतिनिधी: (२६ ऑगस्ट २०२१)सातपुतेवस्ती बावडा येथे लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे जवळपास सहा ते सात एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी तात्काळ(दि.२६) रोजी भेट देत नुकसानाची पाहणी केली व पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना दिल्या.
अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी महावितरण चे अधिकारी यांच्यासमवेत दूरध्वनीवरून संपर्क साधत विद्युत तारा व इतर पोल दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना केल्या जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत व नुकसान होणार नाही.

