आरती जाधव आत्महत्या प्रकरण...!
- दुस-यांदा मुलगी झाली म्हणून सासरच्या जाचाला कंटाळून आरती जाधवची आत्महत्या नव्हे हत्या झाली आहे,
- पुणे पोलिसांनी न्याय द्यावा, चतुश्रूंगी पोलीस गुन्हा का नोंदवत नाही, आरतीची आई मंदा कुशाळकर यांची आर्त कहाणी..
पुणे :- आरती जाधव हिची सासरच्या जाचाला कंटाळून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले. तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिने आई वडिलांना फोन करून सासरचे मंडळी ञास मारहाण करीत असल्याची माहिती दिली होती.
त्यामध्ये तिने सासरची मंडळींनी नाहक ञास दिला म्हणून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. तिची हत्या होऊन एक महिना पूर्ण झाले आहे.परंतु आजही चतुश्रूंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला नाही. चतुश्रूंगी पोलीस ठाण्याचे समीर चव्हाण हे आरतीच्या आई वडिलांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना पोलीस ठाण्याबाहेर पिटाळून लावत आहेत. पिडीत आरतीची आई मंदा कुशाळकर यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात अर्ज करून निवेदन केले असतानाही तिला न्याय मिळत नाही.त्यामुळे पुणे पोलीसांबाबत जनतेमध्ये संभ्रम तयार होत असून जनतेचा विश्वास उडत आहे.
आरती जाधव हिचा मानसिक ञास करणारे पती अमोल अशोक जाधव, सासरे अशोक जाधव, सासू वंदना जाधव, मुलगी कल्याणी जाधव, जगताप हे आरोपी असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. ७ जून रोजी २०२१ रोजी राहते घर संभाजी हौसिंग सो.६\२४ चिंतामणी निवास सेनापती बापट रोड, *माॅडेल काॅलनी पुणे* येथे ही घटना घडली आहे.
स्व.आरतीला दोन मुली असून त्या आता आईविना पोरक्या झाल्या आहेत.त्यांचा सांभाळ कोण करणार? असा सवाल समाजातून केला जात आहे. स्व.आरतीला न्याय मिळवून देण्यासाठी आता सर्व समाजाने एकजूट करण्याची गरज आहे.त्यासाठी मंदा कुशाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे लागेल, आता लढाई करावीच लागेल. मुख्यमंञी उध्दव ठाकरे साहेब मृत आरतीच्या आरोपींना सजा मिळालीच पाहिजे, त्यासाठी मंदा कुशाळकर यांची रितसर तक्रार आमच्या संघटनेकडे आली असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या लढ्यात तन मन धनाने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती,
आपला नम्र,
दिपकदादा शिंदे
अखिल भारतीय वडार समाज संघटना, रजिस्टर
सूचना, हा मेसेज एवढा फाॅरर्वड करावा की, पुणे पोलीस खडबडून जागे झाले पाहिजे,
संपर्क, 9867906135

