अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेने आपली सामाजिक बांधीलकी जपत रक्षाबंधनसण केला साजरा...
शिर्डी शहर प्रतिनिधी :
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील पवित्र सण हा पवित्र सन दरवर्षी बहिण भावाला लाखी बांधून घराघरात साजरा करतात व भाऊ बहिणीच्या प्रत्येक सुख:दुःखात सोबत राहून खंबीर साथ देण्याचे वचन देत असतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर नगर शाखा श्रीरामपुर कडून समाजाच्या संरक्षणासाठी दिवस रात्र खपणाऱ्या पोलिस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन हा पवित्र सन साजरा करण्यात आला.
या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेने आपली सामाजिक बांधीलकी जपत रक्षाबंधन साजरा केला. या निमीत्ताने सर्व सनवार विसरून जबाबदारी सांभाळत पोलिस बांधव, सफाई कर्मचारी व डॉक्टरस यांच्या सोबत श्रीरामपुर तालुका पोलिस टेशन, शहर पोलिस टेशन, दवाखाने, रेल्वे टेशन येथे अभाविपतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. यावेळी सर्व पोलिस बांधावणी, डॉक्टारानीं व सफाई कामगारांनी देखील हा सण उत्साहात साजरा केला. या वेळी अभाविप उत्तर नगर जिल्हा महाविद्यालय प्रमुख प्रफुल्लजी खपके, दर्शन झिरंगे, निखिल कुलकर्णी, देवा वर्मा, स्वपणील जगताप, जीतेश साळुंके आदी कार्यकर्त्यानी सहभाग घेतला.

