shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी साईनगरीत राखी पौर्णिमेनिमित्त अनोखा वृक्ष बंधन सोहळा..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी :
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी साई नगरीमध्ये ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविलेला वृक्ष बंधन एक सेल्फी झाडा सोबत हा उपक्रम भारत सरकारच्या हरीत भारत अभियानाला दिशादर्शक ठरेल, असा अभिप्राय यानिमित्ताने अनेक साईभक्त शिर्डीकरांनी दिला. 


वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे भारतीय संस्कृती मध्ये वृक्षाचे महत्त्व हे प्राणवायू देणारा जीवनाधार असे समजले जाते. करोनाच्या या महामारीत तर अविरतपणे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वृक्षाची उपयोगिता आणखीनच अधोरेखित होताना दिसली. विनामोबदला ऑक्सिजन पुरवठा करणारी वृक्षवल्ली कुठेतरी पुजली जावी व त्या माध्यमातून वृक्षतोडी सारख्या सामाजिक दुर्दैवी शक्तींना आवर घालता यावा या भावनेने आयोजिलेला हा उपक्रम वेगळ्या अर्थाने शिर्डी केवळ एक धार्मिक तीर्थक्षेत्र नसून सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण पूरक आदर्शवाद मांडणारा विचारप्रवाह आहे असे यानिमित्ताने वृक्ष बंधन सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक शिर्डीकर साईभक्तांना वाटले.

 

स्वच्छ शिर्डी अभियान, हरित शिर्डी प्रकल्प, पर्यावरणपूरक गणपती उत्सव, फॅमिली हेल्थ गार्डन, शिर्डी परिक्रमा यासारख्या अनेक आदर्श चळवळी निर्माण केलेल्या ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशनची निश्चितच एका आदर्श सामाजिक संघटनेकडे वाटचाल होताना दिसत आहे, असे यानिमित्ताने प्रतीत होते. सर्वसाधारण नागरीक, दिन दुबळे साई सेवक, निस्सीम साईभक्त अशा समाजातील सामान्य घटकांबरोबरच विविध क्षेत्रात यश संपादन केलेले डॉक्टर्स, सीए, वकील, नोकरदार, शिक्षक, मेडिकल चालक, हॉटेल व्यवसायिक, राजकीय व सामाजिक व्यक्तीमत्त्वे यासर्वांनी तयार झालेला निस्वार्थ ध्येयवेड्या तरुणांचा समूह हीच या परिवाराची खरी ओळख असे यानिमित्ताने जाणवते. सदर उपक्रमात शिर्डी व परिसरातील असंख्य महिला, युवती व मुलींनी सहभाग नोंदवून वृक्ष पूजन करत असतांनाचा त्यांचा सेल्फी सोशल मीडियावर टाकला. सदर उपक्रमाला साजेशी ऑक्सीजन नावाची एक भावणिक चित्रफित यानिमित्ताने ग्रीन एन क्लीन परिवारातील मणिलालजी पटेल व सुनीलजी दवंगे यांनी दिग्दर्शित केली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रीन एन क्लीन शिरडी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अजित पारख, डॉ. जितेंद्र शेळके, मणिलाल पटेल, संजय शिर्डीकर, अँड. अनिल शेजवळ, डॉ.विशाल तिडके सर, सीए प्रसाद वेद, डॉ. धनंजय जगताप, दादासाहेब काळे, सागर वाल्हेकर, मयुर चोळके, प्रा. रघुनाथ गोंदकर, किशोर बोरावके, रविंद्र गोंदकर, ताराचंद कोते, गोपिनाथ गोंदकर आदिंनी विशेष परीश्रम घेतले.
close