लाडेगाव गायरान प्रकरण...
--------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
मागासवर्गीय भूमिहीन लोकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पेरलेल्या पन्नास एकर क्षेत्रावरील खरिपाच्या पिकावर अज्ञात माथेफिरूने तणनाशक फवारून पिकाचे नुकसान केल्याची घटना केज तालुक्यातील लाडेगाव येथे घडली आहे.
केज तालुक्यातील लाडेगाव येथे सर्व्हे नंबर १४३ गायरान जमिनीतील ५० एकर क्षेत्रावर अतिक्रमण करून त्यांनी त्यात सोयाबीन तुर , मुग , बाजरी उडीद या खरीप पिकाची पेरणी केलेली आहे. त्या पिकावर ते त्यांच्या कुटुंबाची उपजीविका करतात.
दरम्यान दि.१४ ऑगस्ट रात्री ते १५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या कालावधीत कुणी तरी अज्ञात माथेफिरूने गायरान जमिनीतील पिक कापून नासधूस केली. उभ्या पिकावर पिकाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने तणनाशक फवारले. यामुळे त्यातील पिकाचे नुकसान झाले आहे.
दि. १५ ऑगस्ट रोजी भिमराव धिरे, बालु घिरे, मोहण धिरे, वचिष्ट धिरे, लक्ष्मण धिरे अंकुश धिरे, रावसाहेब धिरे यांनी; त्यांनी पेरणी केलेल्या गायरान जमिनीतील पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता गायरान जमीनीत गेले असता पिकात लोंकाचे पावलाचे खुणा दिसुन आली. पिक सुकून गेलेले दिसले. तसेच पीक कापुन नुकसान केले दिसले.
या प्रकरणी भिमराव धिरे यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात माथेफिरू विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास युसुफवडगाव पोलीस करीत आहेत.

