(युवासेनेची नगरपंचायत प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी)
हिंगोली प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि१७,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत ते त्वरीत चालु करुन आठवडी बाजार नेहमीच्या जागेवर भरवावा या मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने दि.१७ आँगस्ट मंगळवार रोजी नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले.
सेनगाव शहरातील सर्वच प्रभागातील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत.त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरीकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असुन चोरीच्या घटनेत वाढ होत आहे.यामुळे शहरातील बंद पडलेले पथदिवे त्वरीत चालु करा व शहरातील आठवडी बाजार हा सेनगाव ते गोरेगाव राज्य महामार्गावर भरत असल्याने वाहनाची बरीच वर्दळ होत असल्याने वाहतुक कोंडी होत आहे.त्यामुळे आठवडी बाजार हा नेहमीच्या जागेवर भरवावा तसेच प्रभाग क्र.७ मधील स्वामी समर्थ मंदीर येथे एक पाणीपुरवठा योजनेचा वाँल टाकुन देण्यात यावा जेणेकरून या प्रभागातील नागरीकांना पाणी सुरळीत मिळेल सध्या प्रभागातील नागरीकांना पाणी व्यवस्थीत मिळत नसल्याने हा गंभीर प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अन्यथा युवासेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.या निवेदनावर युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती,जेष्ठ शिवसैनिक कैलास अण्णा खाडे,चेअरमन वैभव देशमुख,गणेश रंजवे,अनिल गिते,शाकेर पठाण आदी युवासैनिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

