shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुराज्य निर्माण सेना चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार व रिपब्लिकन सेना चे इंदापूर तालुका अध्यक्ष यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

सुराज्य निर्माण सेना चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार व रिपब्लिकन सेना चे इंदापूर तालुका अध्यक्ष यांचा काँग्रेसमध्ये  प्रवेश.
      इंदापूर प्रति: (१८ ऑगस्ट २०२१)पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने "व्यर्थ न हो बलिदान"  देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा कुटुंबियातील व्यक्तीचा सन्मान सत्कार कार्यक्रम सोमवारी दिनांक १६ रोजी राजगुरुनगर येथे पार पडला. या कार्यक्रमात इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले. 
       यात प्रामुख्याने सुराज्य निर्माण सेना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत प्रवेश केला. आकाश पवार हे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका उपाध्यक्ष होते. त्यांनी २०१७ मध्ये निमगाव केतकी गणातून पंचायत समिती लढवली आहे. सुराज्य निर्माण सेना इंदापूर तालुक्यामध्ये १५ शाखा आहेत .ते कळंब गाव चे सुपुत्र आहेत.
     याच बरोबर इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील युवराज तानाजी गायकवाड यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अध्यक्ष आहेत. ते पिंपरी गाव व पंचक्रोशीत सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
      यासह नरवटवाडी येथील पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर संतोष दत्तात्रय होगले यांनीदेखील पक्षात प्रवेश केला. त्यांचा ही उजनी बॅकवॉटर क्षेत्रात दांडगा संपर्क आहे.
     जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जी जगताप यांनी सर्वांचे पक्षांमध्ये स्वागत केले यावेळी माजी खासदार अशोक आन्ना मोहोळ , माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी प्रमुख उपस्थित होते.
      काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे व पक्षाला मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळात देखील सर्वसामान्य मध्ये काम करणाऱ्यांना संधी देऊन त्यांच्यामागे पक्षाची ताकद उभा करू असे मत इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी व्यक्त केले.
   यावेळी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर ,इंदापूर शहर अध्यक्ष चमन भाई बागवान ,इंदापूर विद्यार्थी संघटना अध्यक्ष शंभूराजे साळुंखे, पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर भाई काजी ,निवास आण्णा शेळके, महादेव लोंढे ,दत्तात्रेय देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
close