shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खरवंडी व सोनई गटातील दिव्यागांना वैश्विक कार्डचे वाटप..!!


       
" हे कार्ड देशात कुठेही चालणार"--सौ.गडाख

प्रतिनिधी मोहन शेगर 
 
सोनई,राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या दूरदर्शी कारभार पाहता तळागाळातील झोपडपट्टी, दिन दुबळ्या, गोरगरीब, निराधार असलेल्या अपंगाना हिताच्या योजना सुरू करून एक मायेचा हात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा करून हे कार्ड आता  देशात विविध योजनेसाठी पात्र राहणार असल्याचे मत माजी सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केले.
  
     
गडाख हया शनिशिंगणापूर रोडलागत असलेल्या जगदंबा मंदिराच्या सभामंडपात  खरवंडी व सोनई गटातील १४३ दिव्यांग लाभार्थीना सौ.गडाख यांच्या हस्ते वैश्विक कार्ड वाटप करण्यात आले तेव्हा आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर हे होते.
       
गडाख म्हणाले की,तालुक्यातील गावातील एकूण ६०० हुन अधिक दिव्यागांना कार्डचे वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत असल्याने समाधान व्यक्त केले.आता हे कार्ड देशात कोठेही चालणार असून त्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे,तसेच या योजनेची सविस्तर माहिती देऊन त्याचा सर्वांना फायदा होईल, असा आशावाद सौ.गडाख यांनी व्यक्त केला.
         
या प्रसंगी सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, नेवासा मार्केट कमिटीचे चेअरमन डॉ. शिवाजी शिंदे,भाऊसाहेब मोटे, मुळाचे उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले, माजी प.स.सदस्य बाळासाहेब सोनवणे,गायकवाड सर, माजी सरपंच राजाभाऊ बोरुडे, उदय पालवे, द्वारका कुमावत,रोहिणी गर्जे,सरपंच राजेंद्र म्हस्के, सरपंच महादेव दराडे,दादा पा.निपुगे,एकनाथ रौदळ, पाखरे,आदींसह संचालक, ग्रा प.उपसरपंच, सरपंच, दिव्यांग प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
close