शिरोळ तालुक्यातील जैनापूर, कोथळी, उमळवाडा, कुटवार, कानावर, हसुर आदी गावांत संपन्न झाली आरोग्य शिबीरे
आरोग्य राज्य मंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यद्रावकर यांची आरोग्य शिबिरांना सदिच्छा भेट
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात पूर बाधितांची आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप
कल्याणचे खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे आणि ठाणे महानगरपालिकेचे महापौर श्री नरेशजी म्हस्के यांचे आरोग्य शिबिरांना विशेष सहकार्य
प्रतिनिधी । जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७
शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार सांगली - कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे अविरतपणे सुरु आहेत.
शिरोळ तालुक्यातील जैनापूर, कोथळी, उमळवाडा, कुटवार, कानावर, हसुर आदी गावांत आरोग्य शिबीरे संपन्न झाली आहेत.
वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन शिरोळ यांच्या वतीने शिरोळ तालुक्यामधील निवारा छावणीवर असलेल्या पूर बाधीतांसाठी गुरुवारी आरोग्य तपासणी व औषधाचे वाटप करण्यात आले, रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ञ डॉक्टरांच्या कडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली या ठिकाणी जवळपास 250 पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला, यानंतर जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालय वर निवारा छावणीमध्ये असलेल्या पूर् बाधितांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधे पुरवण्यात आली
या ठिकाणी देखील जवळपास 265 पूर बाधीतांना आरोग्य तपासणी सह औषध पुरवण्यात आले, यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहाय्यक प्रसाद सूर्यराव, रवींद्र ननावरे,गोविंद निषाद, नितीन हिलाल, सागर झाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन च्या वतीने डॉक्टर शेखर गौराज, चेतन मगदूम व परवेज मुल्ला उपस्थित होते.

