shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आनंदगाव येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण !!

प्रकाश मुंडे  बीड जिल्हा प्रतिनिधी:-

तालुक्यातील आनंदगाव येथे आरोग्य विभाग  दि (१४) शनिवार रोजी  कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली.


आरोग्य विभाग टीम तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले,बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ यु पी मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक वैद्य के बी,

आरोग्य सेविका 

यु पी काळे ,समुदाय आरोग्य अधिकारी स्वाती चामले, 

आरोग्यसेवक डी एन राऊत , आशाताई अनिता चव्हाण,अज्ञानबाई गंगणे,

अंगणवाडी सेविका छाया आयनोर,जयश्री जाधव,अनुसया सुरवसे

आदी आरोग्य विभागाच्या टीम ने सहकार्य केले.नियोजनासाठी  आनंदगाव  

ग्रामपंचायत चे सरपंच गणेश राऊत,उपसरपंच अशोक भोगजकर,

ग्रामसेवक बी एन रोडगे, तलाठी श्रीमती वाघमारे,कृषी सहायक सतीश नारायणकर,ग्रा प सदस्य तथा तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष हनुमंत सौदागर,मुख्याध्यापक श्री वाळके,श्री शिंदे,श्री धायतिडक

नोंदणीसाठी स्वयंसेवक चक्रधर गायकवाड , विठ्ठल गावरस्कर, नागेश वैरागे आदींनी नियोजन केले.मास्क ,सामाजिक अंतर पाळून सुरळीतपणे लसीकरण शिबीर संपन्न झाले. कोरोना तपासणी आणि गतीने होत असलेले प्रतिबंधक लसीकरण यामुळे आनंदगाव शंभर टक्के कोरोना मुक्त होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी गावातच लसीकरण उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

close