shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनीजवळा येथे लसीकरणाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न..!!

==================

 प्रकाश मुंडे  ! बीड जिल्हा प्रतिनिधी:- 

केज तालुक्यातील सोनीजवळा येथे कोरोनावरील लसीकरणाचा शुमारंभ कार्यक्रम संपन्न झाला .

दिनांक १४आँगस्ट २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सोनीजवळा येथील शाळेत कोरोना लसीकरणचा १ला डोस,व   २ रा डोस देण्यात आला .एकूण १००उपलब्ध करण्यात आले होते .सदरील १००डोस १०० % लाभार्थी यांना देण्यात आले.कोरोना प्रसार होऊ नये म्हणून मास्कचा वापर वा सुरक्षित अंतर ठेवत स्त्री,पुरुषांना लसीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले.




यासाठी आरोग्य कर्मचारी  श्रीमती मस्के मँडम,सुर्यवंशी सर,आशा कार्यकर्ती, सोनीजवळा पंडीत मँडम ,ससाणे मँडम यांनी विशेष परीश्रम घेतले.

तसेच सरपंच सोनीजवळा मुकूंदराव गायकवाड , ग्रामसेवक वरपे साहेब व मुख्याद्यापक राऊत सर व  सर्व शिक्षक स्टाफ यांनी सहकार्य केले.

यापुढे आपल्या गावात १००% लसीकरण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच श्री मुकुंदराव गायकवाड यांनी केले .

कोरोना आजारापासून बचाव होण्यासाठी  लसीकरण

अत्यावश्यक आहे तरी गावकर्यांनी सर्वांनी लस घेऊन गावातुन कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प सोनीजवळा ग्रामस्थांनी केला आह.

close