shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा सहकार सेनेच्या तालुका संघटकांची पहिली बैठक संपन्न.इंदापूर तालुका संघटक सुरज काळे यांनी दिली माहिती.

.पुणे जिल्हा सहकार सेनेच्या तालुका संघटकांची पहिली बैठक संपन्न.
इंदापूर तालुका संघटक सुरज काळे यांनी दिली माहिती.

इंदापूर प्रतिनिधी: (१४ ऑगस्ट २०२१).शिव सहकार सेनेची पुणे जिल्ह्यातील तालुका संघटकाची बैठक (दि.१४ ऑगस्ट ) रोजी  शिल्पाताई सरपोतदार अध्यक्ष यांच्या आदेशानुसार सत्यवान उभे संपर्क प्रमुख पुणे जिल्हा यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रदिप खोपडे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत व रमेश जाधव पुणे जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन डेक्कन पुणे येथे आयोजित करणेत आली होती.सदर बैठकीस तालुक्यातील सन्माननीय तालुका संघटक व समन्वयक - बाळासाहेब भांडे इतर पदाधिकारी हजर होते सदर बैठकी च्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व हिंदुरुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. 
यावेळी सुरज वसंत काळे .इंदापूर, माऊली मोहन आहेर. दौंड, राहुल किसन तावरे .बारामती, रामदास राजाराम लोखंडे. आंबेगाव, भास्कर गेनू भाऊ गाडगे .जुन्नर, नितीन शिवाजी जगताप. हवेली, पांडुरंग विष्णू बनकर .खेड, ज्ञानेश्वर आनंदा डफळ. मुळशी, पोपट विठ्ठलराव खेंगरे. पुरंदर इत्यादी तालुका संघटक उपस्थित होते.

या बैठकी मध्ये सहकार विषयी  प्रदिप खोपडे यांनी तालुका संघटकाशी सविस्तर चर्चा व संवाद घडवून कामाचा आढावा घेणेत आला . तसेच सहकार क्षेत्राविषयी  विस्तृत मार्गदर्शन करणेत आले. 
सदरची बैठक शिव सहकार सेना तालुका संघटकाच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात झाली असून यामध्ये तालुक्यात संघटन करणे तसेच सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांचे आगामी निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते तयार करणे इत्यादी अनेक विषय चर्चा  झाल्याची माहिती शिव सहकार सेना इंदापूर तालुका संघटक सुरज काळे यांनी   दिली.
close