ग्रामपंचायत सदस्य व नागरिकात वादविवाद..!!
प्रतिनिधी, मोहन शेगर सोनई:
सोनई: करोना प्रतिबंधक लसीकरण सोनई आरोग्य केंद्रांत सुरू असुन ग्रामपंचायत कडे नाव नोंदणी करुन लस दिली जाते यामुळे आठवड्यातून दोनदाच लस येत असल्याने आरोग्य केंद्रांत लसी साठी झुंबड उडते यातच काही ग्रामपंचायत सदस्य आरोग्य अधिकारी आपल्या आळखीचे लोकं मधेच घुसवत असल्याने नागरिक आणि सदस्य याचा मध्ये मोठा वाद झाला यामुळे लसीकरण बंद करावे लागले सुरुवातीला आरोग्य विभागाकडून शंभर डोस असल्याचे सांगण्यात आले होते नंतर ब-याच नागरिकांना घरी काढून देण्यात आले मधेच ओळखीचे लोक घुसविल्याने नागरिक व ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य कर्मचारी यांच्या मध्ये प्रचंड वाद झाला.
सोनईतील लसीकरणा साठी आलेले अशोकराव एळवडे याचा ग्रामपंचायत सदस्य यांच्यात प्रचंड वादावादी झाल्याने काही काळ लसीकरण थांबविण्यात आले होते आरोग्य अधिकारी हे आपल्या आळखीचे लोक आधीच लसीकरण करण्यासाठी नेत असल्याने प्रचंड गोंधळ होतो आहे बाहेर गावातील नागरिकांना फोन करून बोलावून घेतले जाते जे नागरिक तास न तास रांगेत उभे असताना सुद्धा या बाहेरुन आलेल्या लसीकरण आधी केले जाते यामुळे गावातील नागरिकांना वेगळा न्याय आणि दुस-याला वेगळा न्याय असा प्रकार सुरु या बाबत आरोग्य अधिकारी यांचे कडे तक्रार केली तरी ते लक्ष देत नाहीत यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.



