shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून सुरेश शेटगे यांची मोफत हृदय रोग ( वॉल रिप्लेसमेंट ) शस्त्रक्रिया संपन्न.

प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
9960595807

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून सुरेश शेटगे यांची मोफत  हृदय रोग ( वॉल रिप्लेसमेंट ) शस्त्रक्रिया संपन्न.
 नाव  सुरेश शामराव शेटगे  .
वय 40.राहणार : 
धनगरमोळा
 ता.आजरा. जि. कोल्हापूर 
 सुरेश शेटगे यांना चालताना दम लागत असे. आणि छातीत त्रास होत असल्यामुळे त्यांना जवळच्या आजरा गावात हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरानी त्यांना  हृदयाशी संबंधित चाचण्या करण्यास सांगितल्या. यामध्ये ईसीजी , टू डी इको करण्यात आली. परंतु परिस्थिती बेताची असल्याने पुढील रिपोर्ट व ट्रीटमेंट करण्यासाठी पैसे नसल्याने सुरेश शेटगे व त्यांचे कुटुंबीय हताश झाले होते. अशा वेळी त्यांच्या नातेवाईक रामदास मराठे यांनी डोंबिवली राहतात त्यांनी मुंबईला या असा सल्ला दिला. रामदास मराठे यांनी आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील त्यांच्याशी संपर्क केला. पाटील यांनी त्यांना सर्व रिपोर्ट घेऊन  छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी जाण्यास सांगितले. धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर.छत्रपती शिवाजी हॉस्पिटल मध्ये त्यांचे स्नेही ज्ञानेश्वर सर त्यांना भेटायला सांगितले. सुरेश शेटगे त्यांना त्या दिवशी ॲडमिट करण्यात आले. त्यांच्या सर्वे रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्यांना टू डी इको आणि ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरनी त्यांना वॉल रिप्लेसमेंट  ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. सुरेश शेठगे यांचे ऑपरेशन  (महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत ) मोफत मध्ये करण्यात आले. सुरेश शेटगे आता त्यांच्या परिवारासोबत ठणठणीत असुन सुरेश शेटगे व रामदास मराठे यांनी आरोग्यम् धनसंपदा  फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील  आणि हॉस्पिटलचे  खूप खूप आभार मानले
close