प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला भाग पाच गुर नं १५५/२१. भादवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला शेतमजूरांचा मुकादम म्हणून काम करीत असल्याचे समजले
याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मायाबाई अशोक पाटील ही महिला इंदिरानगरमधील जिजाबाई लटकन मिस्तरी हिच्या घरासमोर खाटेवर बसून तू उद्या कामाला येशील का असे तिला विचारत असताना त्या ठिकाणी खुशाल तोताराम पाटील हा त्या ठिकाणी दुचाकीने आला व दारूच्या नशेत तो मायाबाई पाटील ला शिवीगाळ करून तू इथे का बसली असे बोलून भांडण केले
तसेच आरोपी खुशाल पाटील याने त्याच्या दुचाकी तील पेट्रोल डब्यात काढून मायाबाई पाटील ईच्या अंगावर टाकले व आगकाडीने आग लावून तिला जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
समाधान सुक्राम गायकवाड याने एरंडोल पोलीस स्टेशनला या बाबत माहिती दिली. दरम्यान पोलीस पाटील विनायक पाटील व काही ग्रामस्थांनी सदर महिलेला भाजलेल्या स्थितीत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

