shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथील इयत्ता ८वी ते १०वीचे वर्ग कोरोना चे नियम पाळून होणार सुरू.

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथील इयत्ता ८वी ते १०वीचे वर्ग कोरोना चे नियम पाळून होणार सुरू.

.  फोटो: जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ करताना शिक्षक व शिक्षण समितीचे पदाधिकारी.

वडापुरीत जिल्हा परिषद शाळा व श्रीनाथ विद्यालय या ठिकाणी कोरोना नियम पाळून केला स्वातंत्र्यदिन साजरा.

फोटो: श्रीनाथ विद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ करताना शिक्षक व पदाधिकारी

इंदापूर प्रतिनिधी: (१५ ऑगस्ट २०२१) विद्यार्थ्यांचे कोरोना काळात होणारे शैक्षणिक नुकसान पाहता श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने चर्चा करून कोरोना काळातील नियमाचे पालन करूनच हे वर्ग चालू करण्यास मान्यता दिली. 
 श्रीनाथ विद्यालय वडापुरी या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या अनुषंगाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद केरबा बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
 तर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या तस्मिना फिरोज शेख यांनी ध्वजारोहण केले.
 यावेळी श्रीनाथ विद्यालय येथे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी तरंगे, दत्तात्रेय गायकवाड, ज्ञानदेव शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट माने, सुरेश जाधव ,माजी सैनिक पांडुरंग चंदनशिवे, युवराज करगळ, माजी मुख्याध्यापक मोहन निंबाळकर, सोपान शेलार हे मान्यवर उपस्थित होते.

 तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी तपासे, सहशिक्षक भारत पासगे, हनुमंत खताळ, सहशिक्षिका अर्चना शिर्के, शकुंतला पवार, सीमा फडतरे, शिक्षकेतर कर्मचारी प्रल्हाद शिर्के, समीर मदने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिर्के मॅडम यांनी केले.

 जिल्हा परिषद शाळा वडापुरी या ठिकाणी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुलगणी मुलांनी ,सदस्य पोपट माने, पालक फिरोज शेख,  शाळेच्या मुख्याध्यापिका रजिया शेख, शिक्षिका मनिषा मोरे, प्रतिभा गरकळ, शिक्षक शामसुंदर माने,अंगणवाडी सेविका सीमा खामगळ आणि लक्ष्मी गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
close