shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे पुरग्रस्तांना एक मदतीचा हात..संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयदादा चौगुले संततधार पावसात चिपळूणला ..!!


विजयदादांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..!!

चिपळूण । प्रतिनिधी:  चिपळूण मध्ये कोसळत असणारा मुसळधार पाऊस, धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्ग त्यामुळे वशिष्ठी व शिव नद्यांना आलेल्या महापूराने रौद्ररूप धारण केले. महापूराने थैमान घालत हाहाकार माजवला. त्यामध्ये अनेक घराचे पडझड व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.

अशा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहमीच समाजाच्या हितासाठी तत्पर असणारे व बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून समाजसेवा आचरणात आणणारे मी वडार महाराष्ट्राचा संघटना संस्थापक अध्यक्ष विजय दादा चौगुले साहेब व संपर्कप्रमुख मा. श्री सुधीर भाऊ पवार यांनी वडार वस्ती येथे घटनास्थळी धावून जात संबंधित अधिकाऱ्यांशी सततचा संपर्क ठेवत पूरग्रस्त समाजबांधवांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. 

मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मदतीचा हात दिला. तसेच  सुधीर भाऊ पवार यांनी चिपळूण येथे दोन दिवस वास्तव्य करून स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना बरोबर घेत समाजबांधवांच्या मदतीसाठी झटत होते .

निसर्गाने उभे टाकलेल्या महाभयंकर संकटाशी सामना करीत प्रसंगी जीवाची पर्वा न करता अनेक अडथळे पार करत समाजबांधवांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य हिंदुराव पवार  व योगेश पवार व त्यांचे सहकारी करत होते हे निश्चितच उल्लेखनीय आहे 
 
विजय दादा चौगुले साहेब व मा. श्री सुधीर भाऊ पवार तसेच  हिंदुराव पवार व सर्व सहकारी यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचे मी वडार महाराष्ट्राचा संघटना, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.
close