shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी दिली जंबो कोविड सेंटरला भेट..!!



प्रतिनिधी । विनया मेढेकर :-

पनवेल :- कोरोनाची तिसरी लाट आल्यास पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आयुक्त श्री. गणेश देशमुख यांचा भर असून महानगरपालिकेचे 635 खाटांचे जंबो कोविड सेंटर अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी आणि आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी कळंबोली येथील भारतीय कापूस निगम येथील नवीन जंबो कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. 


यावेळी पालिका राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त श्री. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठीही हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे. तिसरी लाट आल्यास रायगड जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून  रुग्ण पनवेल मध्ये येण्याची शक्यता असल्याने पनवेल महापालिकेने सज्ज रहावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पनवेल महानगरपालिका सिडकोच्या माध्यमातून कळंबोली येथील भारतीय कापूस निगम येथे जंबो कोविड सेंटर उभा करत आहे. या सेंटरची पाहणी पहाणी  4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर, पालिका मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सिडको कार्यकारी अभियंता डी.एम. बोकाडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद जाधव आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या सर्व विभागांची माहिती घेतली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी ऑक्सीजन पुरवठा, डॉक्टर्स, औषधे, अन्न पुरवठा, या सर्व निविदांची कामे शेवटच्या टप्प्यात  असल्याचे सांगितले. एकुणच जंबो कोविडचे काम पाहून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.


या 635 खाटांच्या जंबो कोविड सेंटरमध्ये 505 ऑक्सीजन खाटा, आयसीयू प्रौढांसाठी 100 खाटा, आयसीयू पिडियाट्रिक 25 खाटा, ट्रायएजसाठी 5 खाटा असणार आहेत. सध्या या रूग्णालयाचे काम युध्दपातळीवर सुरू असून ऑक्सीजन पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. विविध विभाग तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात सर्व रूग्णालयीन उपकरणे याठिकाणी बसविण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट तारखेपर्यंत सर्व काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सिडकोच्यावतीने सांगण्यात येत आहे.
close