प्रतिनिधी । विनया मेढेकर ।
पनवेल :- एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पनवेल येथे दोन वनरक्षकांवर कार्यवाही करण्यात आली आहे. शेत जमिनीवर नवीन तारेचे कंपाउंड बांधताना आणि शेतातील झाडे तोडून कार्यवाही न करण्यासाठी एक लाखाची मागणी केल्याप्रकरणी पनवेल येथील दोन वन रक्षकांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे . त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर गायकवाड वय 36 आणि माधुरी पाटील वय 26 वर्षे अशी दोघांची नावे आहेत.
यातील तक्रारदार हे शेत जमिनी खरेदी-विक्री व्यवहार करून देण्यासंबंधी एजंट म्हणून काम करतात. तक्रारदार यांनी केलेल्या तीन व्यवहारातील शेतजमिनीवर नवीन तारेचे कंपाउंड बांधताना आणि या जमिनीवर असलेले झाडे तोडताना कोणतीही कारवाई न करण्याकरता 30 जून 2021 रोजी मोरबे खैरवाडी रस्त्यावर लोकसेवक ज्ञानेश्वर गायकवाड आणि माधुरी पाटील यांनी तक्रारदार यांच्या कडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यानुसार नवी मुंबईच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली. यावेळी नवी मुंबई लाचलुचपत विभागाने त्याची पडताळणी झाल्यानंतर 28 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच्यावर कारवाई केली. या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करीत आहेत.

