shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेटफळ येथे श्री.संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी साजरी

शेटफळ येथे श्री.संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी साजरी 
       
     इंदापूर प्रतिनिधी:   संत सावता महाराज, एक मराठी संतकवी. ते संत ज्ञानदेव- नामदेव यांचे समकालीन असून पंढरपूरजवळील अरणभेंडी (अरण) ह्या गावचे रहिवासी होत. वडिलांचे नाव परसूबा व आईचे नाव नांगिताबाई.
त्यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. भेंड गावातील रूपामाळी भानवसे ह्यांची मुलगी जनाबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई.
      वारकरी संप्रदायातील तत्कालीन संतसज्जनांमध्ये त्यांचा मोठा लौकिक होता. विठ्ठलभक्तीने भारलेल्या त्यांच्या अभंगरचनांनी काव्यामध्ये भक्तिभावनेचा मळा फुलविला. त्यांचे फार थोडे अभंग उपलब्ध आहेत.

 उदा., कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ 
     
*‘शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥’ श्रीज्ञानदेव व नामदेव ह्या थोर संतांचा सहवास त्यांना वारंवार लाभला असावा. संत नामदेवांनी त्यांच्या अद्वैताचा उल्लेख पुढील शब्दांत वर्णिला आहे: ‘धन्य ते अरण, रत्नाचीच खाण । जन्मला निधान सावता तो । सावता सागर, प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळ्या घरी ॥’

अरणभेंडी ह्या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. 
      असाच पुण्यतिथीनिमित्त सोहळा इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथेही कै.चंद्रकांत भोंगळे यांच्या निवासस्थानी 74 वर्षे झाले करण्यात येतो. हरिजागर,काकडा,काल्याचे किर्तन,दहीहंडी उत्सव,नंतर महाप्रसाद असा मोठा सोहळा साजरा करण्यात येतो. पण दोन वर्ष झाले कोरोना सारख्या महाभयंकर रोगामुळे हा सोहळा शासकीय नियमानुसार साजरा करण्यात येत असून या वर्षी ही भैरवनाथ भजनी मंडळ शेटफळ हवेली यांनी भजन सादर करून साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. या सोहळ्यास मोजक्याच लोकांना निमंत्रित करण्यात आले होते अशी माहिती माळी सेवा संघ इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे यांनी दिली.
close