shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्धट येथे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.- हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार..!!

उद्धट येथे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश...
- हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार...

इंदापूर: प्रतिनिधी (दि.८ ऑगस्ट २०२१)
             
विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक खोटी आश्वासने देण्यात आली, गोड-गोड बोलून दिशाभूल करण्यात आली. मात्र दोन वर्षांमध्ये दिलेली आश्वासने न पाळल्याने भ्रमनिरास झाल्याचे स्पष्टपणे जाहीर करीत उद्धट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये रविवारी (दि.८) प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उद्धट येथे सत्कार केला. 
         
उद्धट गावचे युवा कार्यकर्ते हितेश मखरे, रोहित मुसळे, जुबेर सय्यद, किरण राऊत, समीर कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून  भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
          
यावेळी या तरुणांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आताच्या सत्तारूढांकडून   आपली कशाप्रकारे दिशाभूल व फसवणूक करण्यात आली, याबद्दलच्या भावना स्पष्ट शब्दात व्यक्त केल्या व इथून पुढे दूरदृष्टी असलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे जाहीर केले. याप्रसंगी उद्धट गावचे सरपंच रवी यादव, मार्केट कमिटीचे माजी संचालक दिलीप भोसले, संतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते. 


close