श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न.
राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर शहरामध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील बावडा वेस (माळी गल्ली) येथील श्री संत सावता माळी मंदिरात राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सावता माळी महाराज व श्री विठ्ठल रूक्मिणी मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना (दि.७ ऑगस्ट) रोजी करण्यात आली.यावेळी नामदार भरणे यांच्या शुभहस्ते महाआरती घेण्यात आली. ना.भरणे उपस्थित भाविकांसमवेत टाळ मृदंगाच्या गजरात भक्ति आराधनेत मंत्रमुग्ध झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश शिंदे, इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक पोपट शिंदे, गजानन गवळी, अमर गाडे, स्वप्निल राऊत, दादासाहेब सोनवने, मखरे सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, प्रशांत शिंदे, संजय डोनाल्ड, बाबन शिंदे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

