shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जळगाव जिल्हा वेब मीडिया असोसिएशन च्या एरंडोल तालुका समन्वयक पदी पत्रकार प्रमोद चौधरी यांची निवड...!

      शिर्डी एक्सप्रेस न्युज टीम
एरंडोल:- येथे वेब मिडिया असोसिएशन च्या तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडिया अध्यक्षतेखालील जिल्हा उपाध्यक्ष श्री.योगेश पाटील जिल्हा सचिव श्री. जितेंद्र महाजन, जिल्हा संघटक श्री.कैलास महाजन , जिल्हा खजिनदार प्रा.सुधीर शिरसाठ यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
 तसेच एरंडोल येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते वेब मिडीया असोसिएशन एरंडोल तालुका समन्वयकपदी-प्रमोद चौधरी यांची निवड करण्यात आली.
वेब मीडिया असोसिएशन एरंडोल तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.
close