shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मौजे रेपा येथील राशन दुकानदार चौकशीत दोषी आढळ्याने त्याच्यावर कडक कारवाई करा-पंडीत तिडके..!!

(राशन दुकानदारावर योग्य ती कडक कारवाई करा-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची मागणी) 


हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

दि.५,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे रेपा येथील रेशन दुकानदार धान्य वितरण मशीन वर अंगठे घेऊन धान्य मिळत नसल्याबाबत ची तक्रार स्थानिक गावकर्‍यांसमवेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सेनगाव तालुका सेक्रेटरी अश्रुबा महीबा खंदारे राहणारे रेपा यांनी संबंधित रेशन दुकानदार हे धान्य वितरण मशीनवर अंगठे धेऊन धान्य मिळत नसल्याबाबतची तक्रार सेनगाव येथील पुरवठा अधिकारी यांच्याकडे गावकरी समवेत दाखल केली होती त्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन रेपा येथील रेशन दुकानदार यांचे चौकशी करण्याचे आदेश दि.१४ जुलै रोजी जावक क्रमांक २०२१पत्रानुसार सेनगाव येथील मंडळ अधिकारी शेख ये.आय. यांच्याकडे दिला होता कार्यालयीन संदर्भ पत्रानवे दि.२७ जुलै रोजी दुपारी १२ ते दोन वाजून दहा वाजेपर्यंत रास्त भाव दुकानदार मौजे रेपा येथील श्री विश्वासराव साहेबराव हराळ यांच्या दुकानाची चौकशी केली चौकशी खालील प्रमाणे मुद्दे निहाय माहिती सादर करीत आहे मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री विश्वास साहेबराव हराळ यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना दि.३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वैद्य आहे स्वस्त धान्य दुकानदार मौजे रेपा येथील स्वतः धान्य दुकानात सर्व योजनेचे लाभार्थी  ११८ आहेत पैकी शेतकरी योजनेचे अंतर्गत पंधरा लाभार्थी आहेत,अंत्योदय योजनेचे एकूण बावीस लाभार्थी आहेत व प्राधान्य कुटुंब अन्नसुरक्षा योजनेचे एकूण ८१ लाभार्थी आहेत सदर ११८ लाभार्थी स्वतः धान्य दुकानदार यांच्या ऑनलाईन यादी वर दिसून येतात तरी स्वस्त धान्य दुकानदार विश्वासराव साहेबराव हराळ यांनी त्यांच्या गावातील सतरा लाभार्थी पैकी एक मयत असून सोळा लाभार्थी बाहेरगावी राहतात म्हणून सदर ऑनलाईन यादीवर गोल करून आळा मारला आहे १७ लाभार्थी यांना गोल केल्याने कमी झाल्याचे दर्शवण्यात आले आहे मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार  विश्वासराव साहेबराव हराळ यांनी सोळा लाभार्थी बाहेरगावी राहतात असे दर्शवून पैकी एक लाभार्थ्यांच्या वडिलांना ऑनलाईन माहे धान्य वाटप केले व रजिस्टरवर सही घेतली सदर सही  गोल आळा मारलेले लाभार्थी अनुक्रमांक ११२ राजू सुदाम खिल्लारे हे बाहेरगावी राहत असून त्यांच्या वडिलांना माहे वाटप केले आहे असे दाखविले सदर लाभार्थी कुटुंबासह मागील सहा वर्षापासून बाहेर गावी राहत असतात असे गावकऱ्यांनी सांगितले.




अर्जदार आश्रुबा महिबा खंदारे यांना मे महिन्यात वाटप रजिस्टरवर माल दिल्याबद्दल नोंद केली व सही घेतली असे दुकानदार सांगतात परंतु अर्जदाराने मे महिन्यात माल रेशनच्या उचलला नाही माझी ही सही सुद्धा नाही हि डुपलीकेट सही मारलेली आहे असे निदर्शनात आणून दिले मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी माहे मे २०२१ माहे जून २०२१ या दोन्ही महिन्याचा रेशन चा माल वाटप केल्याबद्दल रजिस्टरवर ठेवले परंतु सदर वाटप रजिस्टर तहसील कार्यालय सेनगाव येथून प्रमाणित करून घेतले नाही तसेच सदर वाटप रजिस्टर वर गावांची सर्व लाभार्थ्यांची नावे लिहून काढली परंतु माल वाटप केल्याबद्दल  थोडक्यात सह्या घेतलेल्या आहेत नावासमोर लाभार्थ्याला गहू व तांदूळ किती प्रमाणात वाटप केला यांच्या सह्या किंवा अंगठी लिहिलेले नाहीत तसेच रेशन दुकानदार यांना दि.२५ जानेवारी २०२१ रोजी अंतोदय लाभार्थ्यांसाठी एकूण वीस किलो साखर नियमीत देण्यात आलेली आहे परंतु अंत्योदया  लाभार्थ्यां असलेल्या खातेदारांना साखर वाटप केली बाबत वाटप रजिस्टर नोंद केलेली नाही मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या दुकानात चौकशीच्या वेळी पंचा समक्ष पाहणी केली असता रेशन माल गहू तथा तांदूळ मिळुन पंचांसमक्ष पंचनामा वर सही केली आहे मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार  विश्वासराव साहेबराव हराळ यांना स्वस्त धान्य दुकान बद्दल बोर्ड व केरोसीनचा बोर्ड लावलेला आहे परंतु बोर्डावर रेशनचा माल किती उपलब्ध झाला स्टॉप किती आहे विक्री किती केली योजने निहाय रेशनच्या मालाचा दर पत्रक इत्यादी नोंद केली नाही मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी गावातील लाभार्थ्यांना रेशनचा माल म्हणून गहू तांदूळ साखर इत्यादी वाटपास सहित तराजू काटा व इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर  न करता पायली व आधली  द्वारे माल वाटप करतात मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार विश्वासराव साहेबराव हराळ यांनी तहसील कार्यालय सेनगाव येथून माहे मे २०२१ व माहे जून

२०२१ या दोन महिन्यांमध्ये रेशनचा ऑनलाईन वाटप नियमित सर्व योजनेचा गहू १२.९ क्विंटल व तांदूळ ८.१४ किलो व तांदूळ ३४ क्विंटल  माहे उचलून दुकानदाराने गहू १४.७३क्विंटल व तांदूळ ८४८ कुंटल वाटप ऑनलाईन रेकॉर्डला दाखविले तरी सदर दुकानदाराने रेगुलर गहू २.६४ कुं. व तांदूळ ०.३४ शिल्लक असताना जास्तीचे  वाटप केले.

मौजे रेपा येथील स्वस्त धान्य दुकानदार विश्वास साहेबराव हराळ यांनी मोफत योजनेचा सर्व योजनेतील गहू ८४४ क्विंटल व तांदूळ ६४८ क्विंटल तहसील कार्यालय सेनगाव येथून वाटपास देण्यासाठी आणला परंतु स्वस्त धान्य दुकानदार यांनी मोफत सर्व योजनेचा गहू ३.३२ क्विंटल व तांदूळ ४.९८ क्विंटल ऑनलाइन रेकॉर्डवर वाटप केल्याचे दिसून येते स्वस्त धान्य दुकानदार यांनी मोफत योजनेचा गहू ८.४४ विरोधात ३.३२ क्विंटल वाटप केला असता मोफत योजनेचा गहू ५.१२ क्विंटल शिल्लक राहिला व तांदूळ ६.४८ कुं यांच्या विरोधात ४.९८ क्विंटल माल ऑनलाइन रेकॉर्डला वाटप  केला सदरील दुकानदार दुकानदाराकडे १५० किलो तांदूळ शिल्लक राहिला परंतु सदरील दुकानदाराकडे चौकशीच्या वेळी तांदूळ अथवा गहू शिल्लक दिसून आला नाही करिता चौकशीअंती पंचनामा नोंदविण्यात आला यासह पुढील कारवाईस सादर. सदरील पंचनाम्याच्या वेळी  १)सुदामराव आश्रुबा खिल्लारे,२)माणिकराव दामाजी लोणकर,३)दत्तराव भगवानराव श्रीरामे,४)पंडितराव सखाराम श्रीरामे,५)मारोती गंगाराम बेले मौजे रेपा येथील रहिवासी असून मंडळ अधिकारी विभाग पुसेगाव यांच्या बोलण्यावरून मौजे रेपा येथील दुकानदार विश्वास साहेबराव हराळ यांच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये एकत्र जमले मंडळाधिकारी पुसेगाव यांनी तहसील कार्यालय सेनगाव चे पत्र जावक क्रमांक २०२१ पुरवठा अधिकारी यांनी दि.१४ जुलै रोजी चे वाचून दाखवल्या वरून या पंचांसमक्ष दुकानची पाहणी केल्यावरून दि.२७ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता  स्वस्त धान्य दुकानदारां समक्ष चौकशी करून पंचनामा लिहून देतेवेळी स्वतः धान्य राशन दुकानदार विश्वास साहेबराव हाराळ हजर होते...


प्रतिक्रिया 

दोषी राशन दुकानदारावर तातडीने कारवाई करावी-पंडीत तिडके

सेनगाव तालुक्यातील रेपा येथील राशन दुकानदार धान्य वितरण मशिनवर अंगठे घेऊन धान्य वाटप करत नसल्या बाबतची तक्रार गावकर्‍यांसमवेत अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे सेनगाव तालुका सचिव आश्रुबा खंदारे यांनी केली होती.मंडळ अधिकारी शेख ए.आय.यांच्या चौकशी अंती रेपा येथील राशन दुकानदार लाभार्थ्यांना शासन परीपत्रकाप्रमाणे धान्य वाटप करत नसल्याचे आढळून आले आहे.अशा दोषी राशन दुकिनदारावर संबधीत विभागाने योग्य ती कडक कारवाई करावी अन्यथा वरीष्ठाकडे दाद मागु 

 पंडीत तिडके

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष

close