राहुरी शहरातील सोनार गल्ली परिसरात श्री. सुरेश बुऱ्हाडे यांचे इथे घराचा पाया खोदायचे काम सुरु असताना जमिनी खाली जुना दगडी पाया असल्याने व त्या मध्ये भरपूर मोकळी जागा असल्याने त्यामध्ये बसलेला एक तस्कर जातीचा ४ फूट लांब साप त्यांना दिसून आला नाही व खोदकाम करताना त्याला मोठी इजा झाली व तो तडफडत बाहेर आला बुऱ्हाडे यांनी ताबडतोब सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना बोलावून घेतले व पोपळघट यांनी त्या जखमी सापाला ताब्यात घेऊन लगेच राहुरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी व राहुरी वनविभाग यांना फोन वरून कळवले असता डॉक्टर हे बाहेर गावी असल्याने तसेच पारसी नूतन वर्ष सणाची सरकारी सुट्टी असल्याने दवाखाना देखील बंद होता परंतु तरी त्यांनी राहुरी मध्ये वास्तव्यास असलेले डॉ. धिमते यांना फोन करून कळवताच डॉ. धिमते यांनी लगेच तयारी दाखवून पोपळघट यांना बोलावून घेतले व आपल्या राहत्या घरीच त्यांनी सापावर उपचार करून त्याला टाके घालून शस्त्रक्रिया केली.
जखमी साप हा पूर्णपणे बरा होताच त्याला निसर्गात मुक्त केले जाईल असे पोपळघट यांनी सांगितले.
५ दिवसांपूर्वी देखील बुऱ्हाडे यांच्या इथे एक छोटा तस्कर जातीचाच साप आधळून आला होता तेव्हा देखील पोपळघट यांनी तो साप पकडून नेला होता.
पोपळघट यांनी आजपर्यंत हजारो साप पकडून निसर्गात मुक्त केले असून अनेक जखमी सापांवर देखील उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करून निसर्गात सोडून दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एका पूर्ण वाढ झालेल्या ६ फूट जखमी नागावर देखील १२ टाक्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून नाग पूर्ण बरा होताच त्याला देखील जंगलात सोडले होते.
पोपळघट यांच्या अशा कामगिरी मुळे त्यांचे तालुक्यातून नेहमीच कौतुक होत असते.
मा. खासदार श्री. प्रसादजी तनपुरे साहेब यांनी देखील पोपळघट यांच्या कार्याची दखल घेत त्यांना उच्च प्रतीची सुरक्षा किट बक्षीस म्हणून दिली आहे.
राहुरी तालुक्यात कोठेही कोणालाही सर्पदंश झाला असता लोक पोपळघट यांना फोन करतात त्यावेळी पोपळघट हे साप विषारी आहेकी बिनविषारी याची शहानिशा करून विषारी साप असल्यास सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ताबडतोब लस मिळण्यासाठी नेहमीच मदत करतात व लस उपलब्ध करून देत असतात.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे 📲7350591600

