shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्जत-जामखेडचे राजकारण निवडणुकी आधीच तापणार !!


जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७

कर्जत : (दि .२०) : कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यात जोदार रस्सीखेच सुरु आहे. आगामी नगर पंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यातच आता भाजपचा मोठा नेता रोहितदादा पवार  यांच्या गळाला लागल्यामुळे कर्जत-जामखेडचे राजकारण निवडणुकी आधीच तापणार आहे.


भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागल्यामुळे तो राम शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेडच्या भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातून एकेक करीत अनेक कार्यकर्ते राजीनामा देऊ लागले आहेत. चार महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता शिंदे यांचे निष्ठावान समजले जाणारे प्रसाद ढोकरीकर यांनी राजीनामास्त्र उगारले आहे. त्यांची राष्ट्रवादीची वाढती जवळीक भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. ढोकरीकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकता उरली आहे.

ढोकरीकर यांनी यापूर्वी आमदार रोहितदादा पवार यांना खासगी कार्यक्रमाला बोलावले होते. हे शिंदे समर्थकांना रूचले नव्हते. शिंदेही त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा रंगली आहे. कारण घटना तशीच आहे. 

नगर पंचायतीला अग्निशमन केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी जागा मिळत नव्हती. नगर पंचायतीने अनेकांना साकडे घातले. मात्र, ते फोल ठरले. रोहितदादा पवार यांनी जागा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत उद्योजक ढोकरीकर व त्यांच्या कुटुंबीयांनी चाळीस लाख रुपये मूल्य असलेली सोळा गुंठे जागा अग्निशमन केंद्रासाठी मोफत दिली. पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांच्या हस्ते व रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे या जागेची कागदपत्रे सुपूर्द केली.
close