shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन



दलित बांधव, कामगारांच्या वेदनांना वाचा फोडण्याचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले - किरण काळे 


प्रतिनिधी : संजय वायकर

अ . नगर :(दि .३१) : अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर होते. त्यांच्या लेखणीला सामाजिक धार होती. साहित्यरत्न असणाऱ्या अण्णाभाऊंनी समाजातील दलित बांधव तसेच कामगारांच्या वेदनांना वाचा फोडण्याचे काम केले असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या लालटकी येथील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला देखील हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते. 


यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, काँग्रेस एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्लाट, एससी काँग्रेस प्रदेश समन्वयक नामदेव चांदणे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, राहुल गांधी विचार मंचाचे अध्यक्ष सागर ईरमल, महिला काँग्रेसच्या सुमन काळापहाड, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनिफ शेख, अजय मिसाळ, शहर जिल्हा सचिव ॲड. सुरेश सोरटे, दिपकराव चांदणे, अनिल ननवरे, ऋतिक लद्दे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, एससी काँग्रेस संघटक प्रशांत भिंगारदिवे, विश्वास जाधव, दत्ता भालेराव, जालिंदर उल्हारे, एससी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष जगताप आदींसह पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

किरण काळे यावेळी म्हणाले की, स्व.अण्णाभाऊ यांनी समाज सुधारणेसाठी त्याचबरोबर दलित चळवळ व कामगार चळवळीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. फक्त दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंच्या लिखाणा मध्ये तत्कालीन समाजस्थितीचे प्रतिबिंब होते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक चुकीच्या गोष्टींना वाचा फोडली. अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या असून अण्णाभाऊंनी तब्बल पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या ही अनन्यसाधारण प्रतिभा आहे. 

याेळी बोलताना शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे म्हणाले की, अण्णाभाऊंनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास अनुसरून दलित चळवळीसाठी काम केले. एससी काँग्रेस विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये जातीयवादामुळे अण्णाभाऊ साठे यांना दुर्दैवाने शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. अण्णाभाऊंनी त्यांच्या लिखाणातून मागासवर्गीय समाजाला विचारांची शिदोरी. एससी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट म्हणाले की, अण्णा भाऊंनी कला पथकाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृतीचे काम केले. आजची तरुण पिढी ही अण्णाभाऊंच्या विचारांवर चालत आहे. 

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या लालटाकी येथील पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला देखील हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी खलील सय्यद, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, नाथाभाऊ अल्लाट, नामदेव चांदणे, निजाम जहागीरदार, सागर ईरमल, सुमन काळापहाड, डॉ. हनिफ शेख, अजय मिसाळ, ॲड. सुरेश सोरटे, दिपकराव चांदणे, अनिल ननवरे, ऋतिक लद्दे, मोहनराव वाखुरे, गणेश आपरे, प्रशांत भिंगारदिवे, विश्वास जाधव, दत्ता भालेराव, जालिंदर उल्हारे, संतोष जगताप आदींसह पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close