shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शनिशिंगणापुरात ७५ फुटी भव्य दिपस्तंभ..!!

साडेपाच कोटी रुपयांच्या खर्चाचे काम अंतिम टप्प्यात;

प्रतिनिधी, मोहन शेगर 

सोनई :- घराला दरवाजा नाही अश्या मुलखा वेगळ्या व जागृत जागतिक दर्जाच्या श्रीक्षेत्र शनी शिंगणापुरच्या वैभवात भर घालणारी गोष्ट म्हणजे दगडी दीपस्तंभ.शनैश्वर देवस्थाने  पानसनाला सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. या कामातील पंच्याहत्तर फुट उंचीच्या साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे.


हा दिपस्तंभ राज्यात सर्वाधिक उंचीचा ठरणार आहे.
 
स्वयंभू शनिमुर्ती वाहुन आलेल्या पानसनाल्याची दुरावस्था झाली होती.स्वयंभू मुर्तीचा इतिहास लक्षात 
घेवून पानसनाला ओढ्याची दुरावस्था झाल्यामुळे  मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर विश्वस्त मंडळाने 55 कोटी रुपये खर्चाचे सुशोभीकरण काम हाती घेतले होते. यामध्ये दर्शनपथ,घाट,बगीचा,विद्युत रोषणाई ,नवग्रह स्तंभ तसेच दगडाच्या छोट्या छोट्या मंदीरांचा सामावेश आहे.
 
शनिमुर्ती व महाद्वार समोर 27 बाय 27 ओट्यावर
पंच्याहत्तर फुट उंचीचा भव्य दिपस्तंभ तयार झाला आहे.यासाठी कर्नाटक राज्यातून ग्रेनाईट दगड वापरण्यात आला आहे.सुमारे पन्नास कारागिर दोन वर्षापासून दगडाला आकार देत सुंदर अश्या कलाकृती घडवत आहे.

दिपस्तंभाच्या बारा आणि पन्नास फुट उंचीवर आठ मंदीरे व दगडी हत्ती विराजमान होणार आहे.हा स्तंभ शनीशिंगणापुर बरोबर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.गोवा येथिल स्थापत्य अभियंता अभिजीत साधले यांनी ही डिजाईन केली आहे.

या स्तंभासाठी तिनशे टनाहून अधिक दगड लागला आहे.या दगडाचे वजन लक्षात घेवून दिपस्तंभाचा 
पाया वीस फुट खोल आर.सी.सी मध्ये घेण्यात आलेला आहे.

ना.शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शनैश्वर देवस्थान विकसीत होत आहे.या स्तंभाचे काम अंतिम टप्प्यात असुन लवकरच पुर्ण होणार आहे.ही बाब शनैश्वर देवस्थान,ग्रामस्थ व भाविकांसाठी आंनदांची गोष्ट आहे.

नितीन शेटे( तांत्रिक अधिकारी शनैश्वर देवस्थान)
close