माझ्या यशात जिल्हा परिषदेच्या शाळेचा व शिक्षकांचा मोठा वाटा - डाॕ अभिजित घनवट.
शिक्षक समितीच्या वतीने डाॕ अभिजित घनवट यांचा सत्कार..
इंदापूर प्रतिनिधी:दि १ निमगाव केतकी येथील सर्वसामान्य घनवट परिवारातील अभिजीत घनवट याने तामीळनाडू मधील चेन्नई मॕथेमॕटीक इन्स्टिट्यूट यांचेकडून गणित विषयात पी एच डी करून डाॕक्टरेट ही पदवी संपादन केल्याबद्दल शिक्षक समिती इंदापूर यांचे वतीने यथोचीत सन्मान केला.
प्रसंगी डाॕ अभिजित घनवट यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नाळेवस्ती व माध्यमिक शिक्षण केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे झाले असे सांगितले. प्राथमिक शाळेत शिक्षण झालेला अभिजितचा प्राथमिक शिक्षकांनी केलेला सन्मान विशेष असल्याचे सांगितले.
प्रसंगी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अरूण मिरगणे , माजी संचालक तथा शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , जुनी पेन्शन इंदापूरचे तालुका अध्यक्ष संतोष हेगडे , अभिजीत घनवटचे प्राथमिक शाळेतील शिक्षक अजिनाथ आदलिंग , शिक्षक भारतीचे सुनिल पवार , संतोष चोरमले , घनवट परिवारातील सदस्य उपस्थित होते.

