shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाहतुकीचे नियम पाळा ;अन्यथा होणार कड़क कारवाई पो .नि .सूर्यकांत कोकणे यांचे नागरिकांना आवाहन


प्रतिनिधी : मुकुंद जव्हेरी

करमाळा : दि.30 /  करमाळा शहरातील एस.टी.बस स्थानक ते पोथरे नाका या दरम्यान मेनरोडवर वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी,अडथळा लक्षात घेऊन दुचाकी वाहनचालकांनी पी-1 व पी-2 या पार्किंगच्या नियमाचे कसोशीने पालन करावे असे आवाहन करमाळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले असून वाहतुकीचे व पार्किंगचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांविरूध्द कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील व वाहने जप्त करण्यात येतील असा इशारा दिला आहे.

या विषयी बोलताना ते म्हणाले,शहरातील मेनरोडसह प्रमुख बाजारपेठेतील सर्वच रस्ते अरुंद असल्याने बेशिस्तपणे वाहने उभी करणे,रस्त्यावरील अतिक्रमणे आदी कारणांमुळे जागोजागी  वाहतुकीची कोंडी होते व पायी चालणाऱ्या नागरिकांना कायमच कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
हे सर्व टाळण्यासाठी वाहनचालक व सर्वच नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी सध्या पोलीस विभागाकडून जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे आणि त्यानंतर मात्र बेशिस्त वाहनचालक,व्यापारी व नागरिक यांच्याविरुद्ध  कडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.तेव्हा नागरिकांनी नियम व शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे असे अपेक्षावजा आवाहन कोकणे यांनी केले आहे.
close