shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिना नदीला आला पूर; जेऊर बायजाबाई येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, अहमदनगर जिल्ह्यात रात्रीपासून संततधार..!!

अहमदनगर, तारिख ३१ ऑगस्ट,(शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे) 

अहमदनगर:जिल्ह्यात आणि शहरात देखिल काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. गेल्यामहिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी विवंचनेत पडले होते परंतु जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाची आशंका हवामान विभागाने तसेच  मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामाशास्त्र अभ्यासक पंजाबराव डख यांनी  वर्तविली होती त्यानुसार त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आल्याने कालपासून पंजाबराव डख यांचे सर्वच शेतकरी आणि शेतकरी पुत्र सोशल मीडिया वर आभार व्यक्त करत आहेत.


             नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने कालपासून जोर धरला आहे. आज सकाळी देखील पावसाची रिमझिम सुरू आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. दोन दिवसांत पाऊस न झाल्याने नागरिक निश्चिंत होते. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झाला. डोंगरभागांत पावसाचे प्रमाण अधिक होते.

डोंगरभागांत चांगला पाऊस झाल्याने पावसाचे पाणी वेगात ओढे, नदी, नाल्यांत झेपावले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. नेप्ती येथील नगर-कल्याण रोडवरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. तसेच अहमदनगर शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. काही वसाहतींमध्ये सखल भागांत पाणी साचले आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र सुरू असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करणे अवघड झाले आहे.


नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला. स्थानिकांच्या मते ढगफुटीसदृश पाऊस होता. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता या मार्गांवर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक करणे कठीण झाले आहे. नालेगाव परिसरातील काही वसाहतींमध्ये घरांत पाणी शिरले. कल्याण रोडवरील सीनानदीवरील पुलावर एक बस पुराच्या पाण्यात अडकली. तथापि, बसमधील चालकाला स्थानिकांंनी सुरक्षितपणे बाहेर काढले.

सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता. त्यामुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बंद झाली होती. पुराच्या पाण्यामुळे धनगरवाडी, चापेवाडी, ससेवाडी, तोडमलवाडी, शेटे वस्ती या ठिकाणाचा संपर्क तुटला. धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळगाव माळवी तलावात पाण्याची आवक झाल्याने तलाव भरला आहे.      

Shirdi Express Live#(अहमदनगर- जिल्हा प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , 📲7350591600

close