shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सीना नदीच्या पूरामुळे नगर-कल्याण रोड वाहतूकीस बंद ; पुरात गाड्या पडल्या अडकून


नागरिकांच्या घरात शिरले पाणी ; तर काही ठिकाणी पुरामुळे वाहतूक ठप्प

 प्रतिनिधी : आसावरी वायकर

अ .नगर : ३१ /
अहमदनगर तालुक्यात व जिल्ह्यात काल सायंकाळ पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून शहरी जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे . साधारणपणे एक ते दीड महिन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर काल सायंकाळ पासुन नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला .

               (फोटो : आकाश अमृत )

नगर शहरातील नेप्ती नाका भागात सीनानदीला पुर आला असुन नगर- कल्याण रोडची वाहतुक बंद झालीआहे. तसेच नगर शहरातील रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आले आहे .त्याच प्रमाणे शहरातील बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. नगर -कल्याण रोडवरील सीनानदी च्या पुलावर एक  ट्रॅव्हल बस पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे . स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीतील प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. 

             (फोटो : आकाश अमृत )

येथील सीना नदीच्या आजुबाजुला असणारे अतिक्रमण नगरकरांसाठी तसा फक्त चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे .

नगर -औरंगाबाद रोड येथील बायजाबाई जेऊर येथेही सीना नदीला पुर आल्याने पूराचे पाणी नगर -औरंगाबाद रोड वरून मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने वाहतूक काही काळ बंद होती .

हवामान तज्ञांनी अंदाजे १० सप्टेबर पर्यंत पाऊस कमी जास्त स्वरूपात राहण्याची शक्यता वर्तविली आहे .
close