shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

होय हाबाडाच! रमेश आडसकरांच्या ईशाऱ्यापुढे तुघलकी प्रशासन झुकले; सांडवा दुरूस्ती करून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिला न्याय..!!

                                 
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-                      धारूर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलावावरील सांडवा फोडल्यामुळे आजुबाजूचे शेतकरी आक्रमक होऊन सांडवा पूर्ववत करण्याची मागणी अंदोलनामार्गे करत होते . 

पण प्रशासन आपले हात झटकून वेळ मारून नेत होते. अशावेळी माजलगाव मतदारसंघाचे लोकनेते रमेश आडसकर ग्रामस्थांचा रास्त मागणीसाठी धाऊन आले व त्यांनी २ आॅगस्ट रोजी रस्ता रोको अांदोलनात सक्रिय सहभाग घेऊन १५ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेऊ असा निर्वाणीचा ईशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले. जागे झालेल्या प्रशासनाने तात्काळ ७ आॅगस्ट रोजी अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा दुरूस्ती करून पुर्ववत करून दिला. 

या मुळे अरणवाडी,चोरंबा,पहाडी पारगाव, थेटेगव्हान,ढगेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.या आंदोलनात अरणवाडी, चोरंबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थांसह क्रषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील शिनगारे, सादेक इनामदार, बाळासाहेब कुरूंद, जलदुत विजय शिनगारे, सिद्धेश्वर रंधवे, प्रभाकर चव्हाण, सुरेश फावडे, बजरंग माने, मधुकर चव्हाण, सचिन अंडील पत्रकार बांधव, वंचित बहुजन आघाडी सह विविध सामाजिक संघटनांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला होता.                       

सांडवा पुनर्बांधणी झाली असली तरी या मध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी व राष्ट्रीय महामार्गाचे पाचशे मीटरपर्यंत रस्ता उंचीकरण,, मजबुतीकरण व सरंक्षण भिंतीचे काम संथ गतीने का सुरू आहे याची चौकशी करून सदरील रस्ता चांगल्या प्रतीचा करावा ही मागणी जोर धरू लागली आहे.                     
                             

धारूर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. अधिकारी व गूत्तेदराच्या संगनमताने हे करण्यात आले होते. ही बाब माहित होताच रस्ता रोको ठिकाणी अधीकाऱ्याला जाब विचारून काम करण्यास भाग पाडले व काम न केल्यास १५ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेऊ असा निर्वाणीचा ईशारा देताच अवघ्या पाच दिवसांमध्येच काम पूर्णत्वास नेले. हे यश माझे एकट्याचे नसुन सर्व आंदोलनात सहभागी जनतेचे आहे. परंतु एक खंत आहे की याकडे लोकप्रतिनिधीने  देण्याची गरज होती पण त्यांचा थोडा सुद्धा सहभाग दिसलाच नाही हे  दुर्दैवी म्हणावे लागेल.      
 
       
                  रमेश आडसकर भाजप नेते.
close