shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खरवडी येथील समता शिक्षण संस्थेच्या दोन जणावर गुन्हा दाखल..!!

प्रतिनिधी ।‌ मोहन शेगर, सोनई 
सोनई,खरवडी ता नेवासा येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे माजी अध्यक्ष व सचिवाने काही वर्षो पुर्वी शेतजमीन नसताना शेती साठी काढलेले कर्ज स्वहताचा फायद्यासाठी वापरले होतें या बाबतच्या तक्रारी नंतर नेवासा न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेचे माजी अध्यक्ष  व सचिव यांच्या वर गुन्हा नोंदविण्यात आला आहे समता शैक्षणिक संस्थेच्या जळके खुर्द ता नेवासा येथील शिक्षण संस्थेत माजी अध्यक्ष अजित रामचंद्र फाटके व सचिव केशव आनंदा थोरात यांनी बँक ऑफ महाराष्ट्र चा नेवासा शाखेकडून ठीबक सिंचनासाठी पिकं कर्ज वीज पंप कंपाऊंड साठी दोन लाख चाळीस हजार रुपये कर्ज काढले होतें संस्थेला शेती नाही धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही बन्सी रामभाऊ म्हस्के यांनी पदाचा गैर वापर खोटी कागदपत्रे बोगस ठराव या बाबत नेवासे न्यायालयात दावा दाखल केला होता मस्के यांच्या तक्रारीनुसार न्यायालयाने आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश देत आरोपीला न्यायालयात हजर राहण्याचे सुनावले होते. 




संस्थेच्या भास्करगिरु महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास शेती शाळा नसतांना तक्रालीन सचिव थोरात व तत्कालीन अध्यक्ष फाटके यांनी स्वताचा फायद्यासाठी कर्ज काढुन वापरले होते असे तक्रारीत नमूद केले होते अनेक वर्ष न्यायालयात हादावा सुरू होता फाटके व थोरात यांनी संगनमत करीत परस्पर विरोधी दावे काढून घेतले साक्षीदार मस्के याची सन २०१८ मधील लक्षात घेऊन न्यायालयाने चार आगष्ट२०२१ रोजी अध्यक्ष फाटके व सचिव थोरात यांच्या वर गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याच्या आदेश दिला आहे शिक्षणाच्या मंदीरात करण्यात आलेल्या गैरकृत्याची परिसरात जोरदार चर्चा करण्यात येत आहे.
close