प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई :- सोनई-सोनई येथील संत नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीच्या वतीने शाखेच्या दहाव्या वर्धापन दिना निमित्त सभासदाना सदगुरू वामन पै. यांच्या विचाराचे पुस्तके भेट स्वरूपात वाटप करण्यात आले.
तसेच सभासदाचे मोफत बाॅडी चेकअप करण्यात आले.संत नागेबाबा मल्टिस्टेटने अल्पावधीतच चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गरूड भरारी घेतली असुन विश्वास व प्रामाणिक व्यवहाराच्या बळावर आज राज्यात व परराज्यात सुदधा ठेवीदार व ग्राहकात नाव कमावले आहे.तसेच या बॅकिंग सेवे बरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवत नागेबाबा परिवार अल्पावधितच लोकप्रिय झाला आहे.तिनशे रूपयात अपघाती दहा लाखाचा विमा पण देत असल्याने नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सोनई येथील शिव छावा शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष पञकार संदिप दरंदले, सामाजिक कार्यकर्ते अंबादास राऊत,माजी उपसरपंच संदिप कुसळकर,दिपक देशमाने,मनोज गडाख,गोविंद निमसे सर आदी प्रमुख सभासद व कार्यकर्ते यावेळी ऊपस्थित होते.यावेळी नागेबाबा परिवारातील कर्मचारी वर्गाचा चांगल्या सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी बॅकेचे व्यवस्थापक प्रविण काशिद व राकेश कुलथे यांनी स्वागत करून आभार मानले.

